कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दिल्ली मुंबईसह गोव्यात नऊ ठिकाणी ईडीचे छापे

12:08 PM Mar 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पणजी : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांच्याशी संबंधित असलेला पुण्यातील लवासा प्रकल्प आर्थिकदृष्ट्या बुडाला होता. हा प्रकल्प अजय सिंह यांच्या डार्विन कंपनीने 1800 कोटी ऊपयांना विकत घेतला होता. आता ही कंपनी आणि संबंधित कंपन्या ईडीच्या रडारवर आल्या असून काल शुक्रवारी दिल्ली, मुंबईं, गोव्यात मिळून नऊ ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये 80 लाख ऊपयांची रोख आणि महत्वाची कागदपत्रे जप्त करण्यात आली आहेत. ईडीने डलेमन रिया-आयटी ट्रेड लिमिटेड या कंपनीवर छापे मारले आहेत. ही कंपनी ऑडिटिंग आणि कर सल्लागार क्षेत्रात काम करते. अजय सिंह आणि त्याच्या साथीदारांच्या ठिकाणाहूंन 78 लाख ऊपये, 2 लाख ऊपयांचे परकीय चलन जप्त करण्यात आले आहे. हरिप्रसाद अकालू पासवान आणि रमेश यादव कुमार हे या कंपनीचे संचालक असून ते लवासा विकत घेतलेल्या डार्विन कंपनीचे मालक अजय सिंह यांच्या नियंत्रणात आहे. डलेमन आणि इतरांनी वेस्टिज मार्केटिंग  कंपनीच्या बँक खात्यातून  फसवणूक करत 18 कोटी ऊपयांची रक्कम वळती केल्याचा आरोप आहे. याच दिवशी ही रक्कम डलेमनच्या बँक खात्यातून डार्विन ग्रुप ऑफ कंपनीजच्या अनेक बँक खात्यांमध्ये तसेच अजय सिंहच्या जवळच्या सहकाऱ्यांच्या बँक खात्यांमध्ये वळती करण्यात आल्याचे ईडीने म्हटले आहे. वेस्टिज मार्केटिंगच्या तक्रारीवरून याची चौकशी केली असता डलेमनचे संचालक हे बोगस असल्याचे समोर आले. या गैरव्यवहाराचा फायदा थेट अजय सिंह यांच्या मालकीची कंपनी डार्विनला झाल्याचे समोर आले आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article