कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सहारा समुहावर ईडीची कारवाई

06:37 AM Apr 17, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बनावट नावांनी खरेदी केलेली 707 एकर जमीन जप्त

Advertisement

नवी दिल्ली :

Advertisement

अमलबजावणी संचालनालयाने (ईडी) सहारा ग्रुपविरुद्ध मोठी कारवाई करत महाराष्ट्रातील लोणावळा, आंबी व्हॅली सिटी येथील 707 एकर जमीन जप्त केली आहे. मोठ्या प्रमाणात आर्थिक अनियमिततेच्या चौकशीत मनी लाँडरिंग कायदा (पीएमएलए) 2002 अंतर्गत ही मालमत्ता जप्त करण्यात आली आहे.

ईडीच्या एका अधिकाऱ्याने मंगळवारी पुष्टी केली की ही उच्च किमतीची जमीन सहारा ग्रुपच्या अनेक कंपन्यांकडून कर्ज घेऊन खरेदी करण्यात आली होती आणि खरी मालकी लपविण्यासाठी बनावट नावांनी नोंदणी करण्यात आली होती.

अधिकाऱ्याने सांगितले की, ‘सहारा ग्रुपच्या संस्थांकडून घेतलेल्या पैशातून ही जमीन बेनामी नावांनी खरेदी करण्यात आली होती.’ याशिवाय, पीएमएलएच्या कलम 17 अंतर्गत केलेल्या शोध मोहिमेदरम्यान ईडीच्या अधिकाऱ्यांनी 2.98 कोटी रुपयांची बेहिशेबी रोख रक्कम जप्त केली आहे.

ओडिशा, बिहार आणि राजस्थानमध्ये हुमारा इंडिया क्रेडिट को-ऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड आणि इतरांविरुद्ध फसवणूक आणि कट रचल्याप्रकरणी दाखल केलेल्या तीन एफआयआरमधून हा खटला उघड झाला आहे. तेव्हापासून, सहाराशी संबंधित अनेक कंपन्या आणि व्यक्तींविरुद्ध  देशभरात 500 हून अधिक एफआयआर दाखल करण्यात आले आहेत, त्यापैकी 300 हून अधिक पीएमएलएमध्ये सूचीबद्ध गंभीर गुह्यांमध्ये येतात.

 

 

Advertisement
Tags :
##tarunbharat#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatsindhudurg#tarunbharatSocialMedia
Next Article