कोल्हापूर बंदमुळे 250 कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प
राजारामपुरी, लक्ष्मीपुरी,गुजरी, महाव्दार रोड येथील उलाढाल थंडावली
कोल्हापूर प्रतिनिधी
बांगला देशातील अत्याचाराच्या निषेधार्थ शुक्रवारी सकल हिंदु संघटनेच्यावतीने कोल्हापूर शहर बंद ठेवण्याची हाक दिली होती. या बंदमुळे शहरातील अत्यावश्य सेवाव्यतिरिक्त इतर सर्व व्यवहार बंद ठेवण्यात आले होते. या बंदमुळे शहरातील एक दिवशाची 250 कोटी रूपयाची आथिंक उलाढाल ठप्प झाली होती. आज शनिवारी महाराष्ट्र बंद तर मंगळवारी व्यापाऱ्यांचा राज्यव्यापी बंद असल्याने, ऐन सणातच व्यावसायिकांच्या व्यवसायावर परिणाम झाला आहे.
कोल्हापूर शहरामधील मोठी आर्थिक उलाढाल होणा गुजरी, महादेव गल्ली, भेंडे गल्ली, कासार गल्ली, आझाद गल्ली या परिसरामध्ये शुकशुकाट दिसत होता. तर शनिवारी गुजरीला आठवडी सुट्टी असल्याने, सराफ बाजारामध्ये आर्थिक उलाढालीबरोबर परिसरामध्ये शांतता जाणवत होती. कांही व्यावसायिक आपल्या दुकानाच्या कट्टावर बसलेले दिसत होते.
महाव्दार रोड, पापाची तिकटी, ताराबाई रोड, छत्रपती शिवाजी चौक, लक्ष्मी रोड वरील कापड, चप्पल,भांडी आदी सर्व दुकाने बंद होती. छत्रपती शिवाजी चौकातील शिवाजी मार्केट, कपिलतिर्थ मार्केट, लक्ष्मीपुरी धान्य बाजार येथील किराणा दुकाने, होलसेल दुकाने बंद होती. यामुळे येथील कामगार ,हमाल यांची रोजंदारी ही ठप्प झाली होती.
, शाहूपुरी स्टेशन रोड व व्हीनस कॉर्नर येथील ज्येलरी शोरूम्स, राजारामपुरी येथील ब्रँन्डेड कंपन्यांचे कापडयांचे शोरूम्स तसेच हॉटेल्स बंद होते. तर नार्वेकर भाजी मंडई, लक्ष्मीपुरी भाजी मंडई, गंगावेश ,डोलें कॉर्नर येथील भाजी मंडईमध्ये शुकशुकाट जाणवत होता. तर शिंगोशी मार्केट येथील फुलाचा बाजार ही पूर्णपणे बंद होता.
सर्व व्यवसाय ठप्प असले तरी रिक्षा, औषध दुकाने, पेट्रोल पंप हे आवश्यक व्यवसाय मात्र सुरू होते. या ठिकाणी पोलिस बंदोबस्त ही ठेवण्यात आला होता.
बंदमुळे 250 कोटीची आर्थिक उलाढाल ठप्प
या ब्ंादमध्ये कोल्हापूर चेंबर ऑफ कॉमसं अॅन्ड इंडस्ट्रिज संलग्नीत अशा 54 संघटना ही बंदमध्ये सहभागी झाल्या आहेत. यामुळे शहरातील 250 कोटी रूपयाची आर्थिक उलाढाल ठप्प झाली असल्याचे कोल्हापूर चेंबरचे अध्यक्ष संजय शेटे यांनी सांगितले.