२४ तासाच्या आत खूनी पोलीसांच्या ताब्यात! पंचर काढल्यानंतर ते पैसे देण्यावरून वाद
हुपरी (वार्ताहर)
मोटारसायकलचे पंक्चर काढल्यानंतर सुट्टे पैसे देण्याच्या कारणावरून एका अल्पवयीन तरुणासह दोघांनी गिरीष विश्वनाथ पिल्लई (वय 47, सध्या रा.हुपरी मुळ गाव उमानूर जि. कोलम केरळ) याचा खून केल्याचे पोलीस तपासात उघडकीस आले असून पोलिसांनी २४तासाच्या आत खूनी नचिकेत विनोद कांबळे, वय १९ वर्षे, धंदा-खाजगी नोकरी रा. शिंगाडे गल्ली, शाहुनगर हुपरी, ता. हातकणंगले यांच्यासह अल्पवयीन बालकास अटक केली आहे. हुपरी पोलीसानी स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेच्या मदतीने हा गुन्हा उघडकीस आणला आहे .
याबाबतची माहिती अतिरिक्त पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे पाटील ,उपविभागिय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे
हुपरी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक एन. आर. चौखंडे यांनी आज दिली.
गिरीष पिल्लाई यांचा जवाहर पेट्रोलपंपासमोरच टायर पंक्चरचे गेल्या वीस वर्षांपासून दुकान आहे त्यांची पत्नी हुपरीतील एका शाळेत शिक्षिका म्हणून कार्यरत होती. मात्र,काही दिवसांपूर्वी परीक्षा देण्यासाठी त्यां आपल्या मुलांना आपल्या मूळ गावी केरळ मध्ये गेल्या आहेत . त्यामुळे रात्री दुकान बंद करून ते दुकानातच झोपले होते. त्यांच्या पत्नीने रात्री त्याना फोन केला मात्र त्यांचा संपर्क झाला नाही त्यांमुळे त्यांनी त्यांच्या मित्राला सांगितले मित्राने दुकानात जाउन पाहिले असता त्याला गिरीष रकक्ताच्या थारोळ्यात आढळून आला. या खुनामुळे अनेक तर्क वितर्क लढवले जात होते.
गुरुवार दि 29 रोजी रात्री ही घटना घडली जवाहर पेट्रोल पंपासमोर असणाऱ्या पंक्चर दुकानात नचिकेत व त्याचा मित्र मोटारसायकल पंक्चर झाली म्हणून आले होते. दुकान बंद केल्यानंतर ही दोघे आली तरीही गिरीष पिल्लाई याने त्याना पंक्चर काढून दिला त्यानंतर या तरुणांनी त्याना पाचशे रूपय दिले मात्र पिल्लाई याने सुट्टे पैसे नाहीत म्हणून आणून द्या असे सांगितले त्यांमुळे या तिघात वाद झाला त्यानंतर त्यांच्यात जोरात भांडण झाले यावेळी नचिकेत याने चिडुन तेथील लोखंडी पाना [टॉमी] घेवुन मयताचे डोकीत, तोंडावर मारली तसेच अल्पवयीन बालकाने त्यांचेकडील चाकु घेवुन पिल्लई याच्या पोटावर मारुन त्यांस गंभीर जखमी करुन ठार मारले आहे असे तपासात निष्पन्न झाले असून पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत अपर पोलीस अधिक्षक निकेश खाटमोडे पाटील , उपविभागिय पोलीस अधिकारी समीरसिंह साळवे यांच्या मार्गदर्शना खाली पोलीस निरिक्षक एन.आर.चौखंडे स्थानिक गुन्हा अन्वेषणचे रविंद्र कळमकर. शेष मोरे. प्रसाद कोळपे. अशोक चव्हाण रावसाहेब हजार पोलीस कॉन्स्टेबल मांडवकर, कांबळे, चालक पोहेकॉ कोले,कांबळे, उदय कांबळे, एकनाथ भांगरे सत्तापा चव्हाण, शेटे दर्शन धुळे, आदींच्या पथकाने हा गुन्हा उघडकीस आणला आहे.