बाहेरचे पदार्थ चवीने खाताय.. मग सावधान !
कोल्हापूर
आजकाल सगळीकडे वीकेण्डला चमचमीत खायचे, एज्नॉय करायचं असा ट्रेण्ड जोरदार सुरु आहे. आठवडाभर सगळ्यांची धावपळ सुरूच असते. त्यात आपल्या जवळच्या माणसांना भेटायला, त्यांच्यासोबत वेळ घालवल्या स्पेशल वीकएण्डचा प्लॅन केला जातो. हे प्लॅन म्हणजे अनेकवेळा हॉटेलिंगचेच असतात. पण या हॉटेलिंगनंतर अनेकांची तब्येत मात्र बिघडते. खर याचे कारण कोणालाच कळत नाही. पुर्वीचे लोक बाहेरचे अन्न खाऊ नका म्हणायचे, ते कशासाठी हे आता समजून घ्या. आपण बाहेर हॉटेल्स, रेस्टॉंरंटस् मध्ये अनेक खाद्यपदार्थ अगदी चवीने खातो, पण घरी आल्यावर मात्र पोट बिघडते. कधी कधी काही पदार्थ खाल्यावर आपल्या हाताच्या बोटाला एक प्रकारचा रंग लागतो. जो एक दोन दिवसतरी बोटावर टिकतो. हे का होते? हे आपल्याला कळतच नाही.
चला याची माहिती घेऊया....
आपल्याकडे अनेक ठिकाणी हॉटेल्समध्ये, रेस्टॉरंटस् मध्ये खाद्यपदार्थ चवीला स्वादपूर्ण आणि दिसायले ही देखणे करण्यासाठी विविध केमिकल्सचा वापर केला जातो. त्याचे नाव अजिनोमोटो (Ajinomoto) म्हणजेच मोनोसोडियम ग्लुटामेट (MSG). हा एक स्वाद वाढवणारा पदार्थ आहे. जो अनेक प्रकारच्या खाद्यपदार्थांमध्ये वापरला जातो. हा पदार्थ खाद्यपदार्थाला चवदार आणि खमंग बनवण्यासाठी उपयोगी असतो. अजिनोमोटो हा जपानी कंपनीचे नाव असून त्याद्वारे तयार केलेल्या MSG ला सामान्यतः त्याच नावाने ओळखले जाते.
अजिनोमोटोचा उपयोग चव वाढवण्यासाठी केला जातो. प्रामुख्याने फास्ट फूड, चायनीज पदार्थ, सूप्स, स्नॅक्स आणि मसाल्यांमध्ये चव वाढवण्यासाठी केला जातो. यामुळे पदार्थाची उमामी (पाचवी चव) चांगली होते, जी चव आपल्याला अधिकाधिक आकर्षित करते. प्रक्रिया केलेल्या पदार्थांमध्ये जसे की नूडल्स, पॅकेज्ड सूप्स, सॉसेस, आणि फ्रोझन पदार्थांमध्ये मोठ्या प्रमाणावर वापर केला जातो.याचे सेवन केल्यानंतरचे संभाव्य दुष्परिणाम...
एमएसजी च्या वापराने मुख्यतः आरोग्यावर दुष्परिणाम होतात. काही लोकांना तर "Chinese Restaurant Syndrome" किंवा MSG सिम्पटम कॉम्प्लेक्स जाणवतो. यामध्ये डोकेदुखी, घाम येणे, थकवा, आणि छातीत जळजळ होण्यासारख्या समस्या येऊ शकतात. काही लोकांना MSG मुळे अॅलर्जी होऊ शकते, ज्यामुळे त्वचेवर पुरळ येणे, खाज येणे, किंवा सूज येणे यांसारखी लक्षणे दिसू शकतात. जास्त प्रमाणात एमएसजी खाल्ल्यास उच्च रक्तदाब, मधुमेह, आणि जाडी यांसारख्या समस्या उद्भवू शकतात. अजिनोमोटो मुळे काही संशोधनांमध्ये न्यूरोलॉजिकल समस्या निर्माण होण्याची शक्यता व्यक्त केली गेली आहे. गरोदर स्त्रिया आणि लहान मुलांमध्ये अजिनोमोटोचा वापर टाळावा असा सल्ला दिला जातो, कारण त्याचा शरीरावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो.
एमएसजीचा वापर करताना सुरक्षित रहाएमएसजीचा उपयोग प्रमाणात केला तर तो सुरक्षित मानला जातो. WHO आणि FDA ने MSG ला सुरक्षित पदार्थ म्हणून मान्यता दिली आहे, पण त्याचा अतिरेक टाळावा. खाद्यपदार्थ खरेदी करताना त्यावरील लेबल वाचून MSG आहे का हे तपासा. मीठ, आले, लसूण, लिंबू, आणि मसाले यांसारख्या नैसर्गिक चव वाढवणाऱ्या पदार्थांचा वापर करा.
अजिनोमोटो (MSG) संबंधित काही..
दिल्ली उच्च न्यायालयाने एका तामिळ चित्रपटाच्या नावावर स्थगिती दिली आहे, जो "अजिनोमोटो" या शीर्षकाने प्रदर्शित होणार होता. अजिनोमोटो कंपनीने दावा केला की चित्रपटाचा हा नाव उपयोग त्यांच्या ब्रँडसाठी अपमानजनक ठरू शकतो. कंपनीला वाटते की या चित्रपटामुळे त्यांच्या उत्पादनाबद्दल चुकीचे समज निर्माण होऊ शकता. अजिनोमोटो ग्रुपने MSG संबंधित चुकीच्या समजुतींना दूर करण्यासाठी एक नवीन मोहीम सुरू केली आहे. यामध्ये त्यांनी MSG च्या सुरक्षिततेसाठी आणि त्याचा उपयोग अधिकाधिक समजून घेण्यासाठी शास्त्रीय आधार दिला आहे.