हिवाळ्यात खा पौष्टिक डिंकाचे लाडू
हिवाळ्यात डिंकाचे लाडू खाणे फायदेशीर मानले जाते. डिंकाचे लाडू खाल्ल्याने तुम्हाला फक्त टेस्ट नाही तर शरीराला कॅल्शियम आणि प्रोटीन मुबलक प्रमाणात मिळतात. हे खाल्ल्याने हाडे मजबूत होतील आणि स्नायू बळकट होण्यासही सक्षम आहे. चला तर मग जाणून घेऊयात डिंकाचे लाडू कसे बनवावे
साहित्य
गव्हाचे पीठ
गूळ पावडर
वेलची पावडर
तूप
डिंक
खोबरं
बदाम आणि काजू
कृती
सर्वप्रथम एक जाड बुडाचे भांडे किंवा कढई घ्या. त्यामध्ये एक चमचा तूप गरम करा. आता त्यामध्ये कापलेले बदाम आणि काजू घाला. नंतर गोल्डन ब्राऊन होईपर्यंत भाजून घ्या. थंड झाल्यावर हे ड्राय फ्रूट्स बारीक करुन घ्या. आता कढईत थोडे किसलेले खोबरे घालून एक-दोन मिनिटे परतून घ्या. ड्रायफ्रुट्स आणि नारळ यांचे मिश्रण काढून प्लेटमध्ये ठेवा. पुढे डिंक भाजण्यासाठी तूप गरम करा. डिंक टाळून घ्या. ते थंड होऊ द्या आणि नंतर मिक्सर ग्राइंडरमध्ये बारीक करा. आता पॅन पुन्हा गरम करून त्यात सुमारे ३ टेबलस्पून तूप घाला. तूप वितळले की त्यात गव्हाचे पीठ घालून सोनेरी होईपर्यंत भाजून घ्या. हे पीठ सतत ढवळत राहा, पीठ भाजल्यानंतर गॅसवरुन उतरवून घ्या. आता त्यात तळलेले ड्राय फ्रूट्स आणि डिंक घाला. वेलची पावडर आणि गूळ पावडर घाला. ते चांगले मिक्स करा. आता थोडे थोडे मिश्रण घेऊन लाडू तयार करा. असेच सर्व लाडू बनवून घ्या आणि पॅकबंद डब्यात साठवून ठेवा.