महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

पूर्व विभाग महिला संघ विजेता

01:00 AM Apr 13, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ पुणे

Advertisement

येथे सुरू असलेल्या वरिष्ठांच्या महिलांच्या आंतरविभागीय मल्टी डे चषक क्रिकेट स्पर्धेतील झालेल्या अटीतटीच्या सामन्यात कर्णधार दीप्ती शर्माच्या अष्टपैलू कामगिरीच्या जोरावर पूर्व विभागाने दक्षिण विभागावर केवळ एक गडी राखून थरारक विजय मिळविला. या विजयामुळे पूर्व विभाग महिला संघाने ही स्पर्धा जिंकली.

Advertisement

या सामन्यात द. विभागाने पहिल्या डावात 133 धावा जमविल्यानंतर पूर्व विभागाचा पहिला डाव 43.4 षटकात 129 धावात आटोपला. त्यानंतर दक्षिण विभागाने दुसऱ्या डावात 179 धावा जमवल्या. पूर्व विभागाने दुसऱ्या डावात 61.3 षटकात 9 बाद 184 धावा जमवित हा सामना केवळ एक गड्यांनी जिंकला. पूर्व विभाग संघातील दीप्ती शर्माने 46, रिचा घोषने 33 धावा झळकविला.

या स्पर्धेतील हा अंतिम सामना चार दिवसांचा खेळविण्यात आला. पूर्व विभागाने 2 बाद 30 या धावसंख्येवरून खेळाला पुढे सुरुवात केली. दीप्ती शर्मा आणि रिचा घोष यांच्या समयोचित फलंदाजीमुळेच पूर्व विभागाला हा सामना जिंकता आला.

संक्षिप्त धावफलक : द. विभाग प. डाव 133, दु. डाव 179, पूर्व विभाग प. डाव 129, दु. डाव 61. 3 षटकात 9 बाद 184.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article