For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बागानकडून इस्ट बंगाल पराभूत

06:04 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
बागानकडून इस्ट बंगाल पराभूत
Advertisement

वृत्तसंस्था/ लखनौ

Advertisement

येथील के.डी.सिंग बाबु स्टेडियमवर खेळविण्यात आलेल्या मुख्यमंत्री चषक मदत निधी प्रदर्शनिय फुटबॉल सामन्यात मोहन बागानने पेनल्टीमध्ये इस्ट बंगालचा 3-2 अशा गोल फरकाने पराभव केला.

या सामन्यात सुहेल अहम्मद भट्टने पूर्वाधार्थ मोहन बागानचा गोल केला. त्यानंतर उत्तराधार्थ मोहम्मद आशिकीने इस्ट बंगालला बरोबरी साधून दिली. निर्धारीत वेळेत दोन्ही संघ 1-1 असे बरोबरीत राहिले. पंचांनी पेनल्टीचा अवलंब केला आणि पेनल्टीशूटआऊटमध्ये बागानतर्फे सेर्टो कॉम, अदिल अब्दुल्ला, रवी बहाद्दुर राणा यांनी गोल नोंदविले. तर इस्ट बंगालतर्फे आशिकी आणि चिकु मंडी यांनी गोल केले. मोहन बागानचा गोल रक्षक आदित्य पात्राने इस्ट बंगालचे 3 फटके रोखल्याने बागानने हा सामना जिंकला.

Advertisement

Advertisement
Tags :

.