महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

चिनी धरणामुळे पृथ्वीचा वेग मंदावला

06:51 AM Jul 17, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वादग्रस्त ठरले जगातील सर्वात मोठे धरण

Advertisement

पावसाळा असल्याने नद्यांची पातळी वाढत आहे, अशा स्थितीत धरणांचे महत्त्व अधिकच होते. धरणं नसतील तर पाणी नागरी वस्तींमध्ये शिरते. पूर रोखण्याकरता तसेच वीजनिर्मितीकरता धरण उपयुक्त असते. परंतु एक धरण वादग्रस्त ठरले आहे. हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. चीनच्या थ्री गॉर्जेस धरणामुळे होणारे नुकसान जाणल्यावर धक्काच बसेल. या धरणाने पृथ्वीच्या फिरण्याचा वेगच कमी केला आहे. जगातील हे सर्वात मोठे धरण चीनमध्ये असून याचे नाव थ्री गॉर्जेस आहे. हे एक हायड्रोइलेक्ट्रिक ग्रॅव्हिटी प्रकारातील धरण आहे.

Advertisement

चीनच्या हुबेई प्रांतात यांग्जी नदीवर याची निर्मिती करण्यात आली आहे. यांग्जी ही जगातील तिसऱ्या क्रमांकाची लांब नदी आहे. या नदीची लांबी 6 हजार किलोमीटरपेक्षाही अधिक आहे. यांग्जी नदीला येणाऱ्या भयंकर पूराचा इतिहास आहे. दर दहा वर्षांनी याचे काठ वाहून जात होते. केवळ 20 व्या शतकातच यात आलेल्या पुरामुळे सुमारे 3 लाख लोक मारले गेले होते.

आकार, उंची, खर्च...सर्वकाही अत्याधिक

पूर नियंत्रित करणे, दीड कोटी लोक आणि लाखो एकर कृषीभूमी वाचविण्यासाठी या धरणाची निर्मिती करण्यात आली होती. स्टील आणि काँक्रिटने निर्मित हे धरण 2.3 किलोमीटर लांब, 115 मीटर रुंद आणि 185 मीटर उंच आहे. हे जगातील सर्वात मोठे धरण आहे. या धरणाच्या निर्मितीकरता अडीच लाख कोटी रुपयांपेक्षा अधिक खर्च आला आहे. हे धरण तयार करण्यासाठी सुमारे दोन दशकांचा कालावधी लागला आहे. याची निर्मिती 1994 मध्ये सुरू झाली होती आणि 2012 मध्ये ते पूर्ण झाले होते.

हजारो टन स्टीलचा वापर

थ्री गॉर्जेस धरण निर्माण करण्यासाठी 4 लाख 63 हजार टन स्टीलचा वापर झाला आहे. इतक्या स्टीलमधून 60 आयफेल टॉवर उभे करता येऊ शकतात. या धरणातून निर्माण होणाऱ्या वीजेतून अनेक छोट्या देशांना प्रकाशमान केले जाऊ शवपे. यात 22,400 मेगावॅट वीज निर्माण करण्याची क्षमता आहे.

वादग्रस्त का?

धरण पुराचे पाणी रोखण्यास यशस्वी ठरल्याचा दावा चीन करत असला तरीही थ्री गॉर्जेस धरण जलप्रदूषण आणि पर्यावरणीय धोक्यांवरून वादात सापडले आहे. आजही चीन अतिवृष्टी आणि भयंकर पूराला सामोरा जात आहे. यामुळे धरणाच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह उभे राहते.

भूस्खलन, पुराचा प्रभाव

1992 मध्ये धरणाच्या निर्मितीला सुरुवात करण्यात आल्यावर अनेक वैज्ञानिकांनी या धरणाच्या आसपासच्या बेटांवरील दबाव वाढून भूस्खलन होईल असा इशारा दिला होता. तसेच जैवविविधतेला धोका निर्माण होणार असल्याचे त्यांनी म्हटले हेत. 2003 मध्ये 700 दशलक्ष क्यूबिक फुटाचा पर्वत यांग्जीपासून 2 किलोमीटर अंतरावरील किंगगन नदीत सामावला होता, यामुळे 14 जणांना जीव गमवावा लागला होता. तरीही चायना यांग्त्से थ्री गॉर्जेस डेव्हलपमेंट कॉर्पेरेशनने स्वत:च्या जलाशयातील पातळी 445 फूटांवरून वाढवत 512 फूट केली, यामुळे अनेकदा भूस्खलन झाले. 2020 मध्ये देखील फ्लड वेव्ह्जमुळे धरणाचे दार उघडावे लागले, हा फ्लॅश फ्लड होता, तेव्हापासून यांग्त्जी नदी पूराला तोंड देत आहे. पुरामुळे चीनच्या अनेक हिस्स्यांमध्ये शेकडो जणांनी जीव गमावला आहे. 14 लाखाहून अधिक जण विस्थापित झाले, त्यांची घरे नष्ट झाली. शेकडो एअर कृषी भूमी पुरात बुडाली. यांग्त्जी नदीच्या काठावर वसलेली दोन शहरे आणि 100 हून अधिक वस्ती तसेच 1600 गावे बुडाली. पाण्याच्या माऱ्यामुळे यांग्त्जी नदीच्या काठांचा महत्त्वपूर्ण हिस्सा नष्ट झाला आहे.

धरणामुळे झाले नुकसान

हे धरण दोन मोठ्या फॉल्ट लाइन्सवर निर्माण झालेले आहे. यामुळे येथे भूकंप होत असतात, 2003मध्ये येथे पर्वताचा एक मोठा हिस्सा येथे तुटून नदीत कोसळला होता, यामुळे 24 जण मारले गेले होते. एकदा धरणाच्या भिंतीला तडे गेले होते. चीनमध्ये थ्री गॉर्जेस धरणाच्या आसपासच्या क्षेत्रात 6400 रोपांच्या प्रजीत, 3400 किटक प्रजाती, माशांच्या 300 प्रजाती आणि 500 हून धिक स्थानिक कशेरुक प्रजाती आढळून येतात. या धरणामुळे या प्रजाती धोक्यात सापडल्या आहेत.

पृथ्वीवर झालेला परिणाम

या धरणाचा सर्वात मोठा प्रभाव पृथ्वीवर पडला आहे. नासाच्या वैज्ञानिकांनी 2005 मध्ये थ्री गॉर्जेस डॅममुळे पृथ्वीच्या फिरण्याचा वेग मंदावला असल्याचा निष्कर्ष काढला होत. अनेक गोष्टी पृथ्वीच्या फिरण्याच्या वेगाला प्रभावित करतात. भूकंप, वारे, हवामान बदल आणि चंद्राच्या स्थितीचा यात समावेश आहे. धरणाच्या जलाशयात 42 अब्ज टन पाणी आहे. यामुळे पृथ्वी फिरता फिरता स्वत:चे मोमेंटगम गमावून बसते. द्रव्यमानात बदलामुळे एक दिवसाची वेळ 0.06 मायक्रोसेकंदाने वाढली आहे. म्हणजे धरणामुळे आता दिवस थोडा लांबला आहे. नासानुसार या धरणामुळे उत्तर आणि दक्षिण ध्रूव देखील स्वत:च्या जागेवर प्रत्येकी 2 सेंटीमीटरने सरकले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article