महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

अफगाणिस्तानपासून दिल्लीपर्यंत भूकंपाचे धक्के

07:00 AM Jan 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

6.1 रिश्टर स्केल तीव्रता : हिंदुकुशमध्ये  पाकिस्तान-अफगाणिस्तान सीमेवर केंद्रबिंदू

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

अफगाणिस्तानपासून उत्तर भारतापर्यंत गुरुवारी दुपारी भूकंपाचे तीव्र धक्के जाणवले. या भूकंपाची तीव्रता 6.1 रिश्टर स्केल इतकी नोंद झाली होती. अफगाणिस्तानातील फैजाबाद परिसरात हिंदुकुशमध्ये या भूकंपाचा केंद्रबिंदू होता. याची तीव्रता उत्तर भारतातील बहुतांश राज्यांमध्ये जाणवली. भारतातील जम्मू-काश्मीर, दिल्ली-एनसीआर, पंजाबमध्ये हे भूकंपाचे धक्के जाणवले. अफगाणिस्तानात भूपृष्ठापासून 220 किलोमीटर खाली झालेल्या या भूकंपामुळे पाकिस्तानातही जोरदार हादरे बसले. दिल्ली-एनसीआरमध्ये गुरुवारी भूकंपाचे धक्के जाणवले. जम्मू-काश्मीरमध्येही भूकंपाचे जोरदार धक्के जाणवले. दिल्लीला लागून असलेल्या नोएडामध्येही भूकंपाच्या धक्क्मयांमुळे लोक घराबाहेर पडले. अलीकडच्या काळात दिल्ली-एनसीआरमध्ये सातत्याने भूकंपाचे धक्के बसत आहेत. हे क्षेत्र भूकंपाच्या दृष्टिकोनातून अत्यंत संवेदनशील मानले जाते. भारताची राजधानी दिल्ली हेसुद्धा भूकंपाच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील ठिकाणांपैकी एक असल्यामुळे अलिकडच्या काळात येथे वारंवार भूकंपाचे धक्के जाणवत आहेत. गुरुवारी दुपारी जाणवलेल्या भूकंपाचा केंद्रबिंदू पाकिस्तान आणि अफगाणिस्तानच्या सीमेवर असल्याचे सांगण्यात येत आहे. 6.1 रिश्टर स्केलच्या या भूकंपामुळे कोणतीही जीवित वा वित्तहानी झाल्याचे वृत्त नाही. मात्र, भूकंपामुळे दोन ते अडीच वाजण्याच्या सुमारास जाणवलेल्या या धक्क्यांमुळे लोक घाबरून घराबाहेर पडले. कार्यालयात काम करणारे लोकही मोकळ्या जागेवर आले होते. काही दिवसांपूर्वीच जपानमध्ये 7 पेक्षा जास्त तीव्रतेच्या भूकंपात अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article