महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंगमध्ये भूकंप

06:36 AM Jun 10, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

रिश्टर स्केलवर 3.8 तीव्रता

Advertisement

वृत्तसंस्था/ ईटानगर

Advertisement

अरुणाचल प्रदेशच्या पूर्व कामेंगमध्ये रविवारी सकाळी भूकंपाचे धक्के जाणवले आहेत. भूकंप रविवारी सकाळी 10.05 वाजता जाणवला असून याची तीव्रता 3.8 इतकी होती असे राष्ट्रीय भूकंप विज्ञान केंद्राकडून सांगण्यात आले. तर राष्ट्रीय भूकंपीय देखरेख केंद्रानुसार भूकंपाच्या या धक्क्यामुळे कुठल्याही प्रकारची जीवित तसेच आर्थिक हानी झाल्याचे वृत्त समोर आलेले नाही.

भूकंपाचा केंद्रबिंदू 10 किलोमीटर खोलवर होता. भारताच्या ईशान्य भागातील हे क्षेत्र हिमालयीन नजीकतेमुळे भूकंपीय हालचालींसाठी ओळखला जातो.  पूर्व कामेंग जिल्ह्dयाच्या रहिवाशांनी भूकंपाचे सौम्य झटके जाणवल्याची माहिती दिली आहे, परंतु संपत्तीचे नुकसान किंवा जीवितहानीची कुठलीही बाब समोर आलेली नाही. स्थितीचे आकलन करणे तसेच लोकांची सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी प्रशासनाने मदतपथकांना रवाना केले आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat#social media
Next Article