महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

आयुष्याची कमाई झाडांच्या संगोपनात...

06:33 AM Jun 23, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काही माणसे विशिष्ट ध्येयाने अक्षरश: झपाटलेली असतात, हे सर्वपरिचित आहे. आपल्या ध्येयाच्या पूर्तीसाठी ते सर्वस्वाचा त्याग करण्यास मागेपुढे पहात नाहीत. आपल्या ध्येयासामोर त्यांना संपत्ती, घरदार किंवा सुखोपभोग तुच्छ वाटतात. आपले सर्वस्व अर्पण करुन ते समाजासाठी भव्यदिव्य कार्य करुन दाखवितात.

Advertisement

कित्येकदा अशा त्यागी लोकांकडे आपले लक्ष जात नाही. ते अप्रकाशित राहतात. कालांतराने त्यांच्या कार्याचे महत्व आपल्यासमोर येते. मध्यप्रदेश राज्यातील जबलपूर येथील 76 वर्षांचे सोहनलाल द्विवेदी यांनी पर्यावरण संरक्षणाच्या क्षेत्रात असे महान कार्य मोठा त्याग आणि परीश्रम करुन केलेले आहे. द्विवेदी हे जबलपूरच्या वीज पुरवठा विभागातून निवृत्त झाल्यानंतर त्यांनी आपले जीवन वृक्ष आणि झाडांचे संरक्षण आणि संवर्धन यांच्यासाठी वाहिले. आज त्यांनी, नामशेष होऊ घातलेल्या 2 हजार 500 दुर्मिळ वनस्पतींचा संग्रह आपल्या घरातच केला आहे. या वनस्पती नामशेष होऊ नयेत आणि त्यांचे बीज जिवंत रहावे म्हणून त्यांनी या वनस्पतींचे ‘बोन्साय’मध्ये रुपांतर करुन त्यांचे संरक्षण आणि संवर्धन केले आहे. आपल्या घराचे नावही त्यांनी ‘बोन्साय बसेरा’ असे ठेवले आहे. 40 वर्षांची आपली सर्व आर्थिक कमाई त्यांनी या महान कार्यासाठी व्यतीत केली. त्यामुळे अनेक दुर्मिळ वनस्पतींना जीवदान मिळाले आहे. त्यांच्या या कार्याची नोंद आता अनेक संस्था आणि सरकारकडून घेतली जात असल्याची माहिती आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article