केवळ हात दाखवून लाखोची कमाई
‘हँड मॉडेल’ची कहाणी व्हायरल
जगात अनेक प्रकारचे प्रोफेशन असतात. असेच एक अनोखे काम आहे ‘हँड मॉडेलिंग’. न्यूयॉर्कमध्ये राहणारी अविषा तिवानी या कामातून लाखोंची कमाई करत आहे. ती केवळ स्वत:च्या हातांची छायाचित्रे काढून घेत प्रसिद्ध ब्रँड्ससाठी काम करते.
35 वर्षीय अविषा प्रोफेशनल हँड मॉडेल असून डियोर, शॅनल, स्टारबक्स, कोका-कोला, एबसोल्यूट व्होडका आणि काइली कॉस्मेटिक्स यासारख्या हाय-एंड इंटरनॅशनल ब्रँड्ससोबत तिने काम केले आहे. अविषा पूर्वी एक फ्रीलान्स स्टायलिस्ट म्हणून काम करायची. 2020 मध्ये तिने परिवारातील एका सदस्याच्या ज्वेलरी शूटमध्ये मदत केली, तेव्हा तिला प्रथम हँड मॉडेलिंगची कल्पना सूचली.
तुझी बोटं लांब आणि सुंदर आहेत, हँड मॉडेलिंग का करत नाही, अशी परिवाराच्या एका सदस्याने तिला केली होती. मग अविषाने गुगलवर हँड मॉडेल न्यूयॉर्कसिटी आणि एका एजंटला स्वत:ची छायाचित्रे पाठविली. यानंतर केवळ एक आठवड्यात तिला पहिला प्रोजेक्ट मिळाला आणि येथूनच तिच्या आयुष्याने नवे वळण घेतले. स्वत:च्या हातांना परिपूर्ण आणि पॅमेरा-रेडी ठेवण्यासाठी अविषाने स्वत:च्या आयुष्यात अनेक बदल केले आहेत. तिने सायकल चालविणे सोडून दिले आहे, तसेच ती आता बॉक्सिंगसारख्या वर्कआउट पासूनही दूर राहते. भांडी घासताना आणि जिममय्धे एक्सरसाइज करताना मी ग्लोव्हज परिधान करते, जेणेकरून नखं आणि त्वचेवर ओरखडे उमटू नयेत. प्रत्येक शूटपूर्वी स्पेशल मॅनिक्योर करविते आणि शूटदिवशी जखम किंवा कट लागू नये, याची काळजी घेत असल्याचे अविषा सांगते.