महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

मंगळूर विमानतळावर बॉम्ब ठेवण्यात आल्याचा पोलिसांना ई-मेल

06:31 AM May 05, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

मंगळूर आंतरराष्ट्रीय विमानतळावर आणि विमानामध्ये बॉम्ब ठेवण्यात आल्याची धमकी देण्यात आली आहे. काही तासातच सर्व बॉम्बचा स्फोट होऊन मोठ्या प्रमाणावर रक्तपात होईल, असे दहशतवाद्यांच्या नावाने पोलिसांना ई-मेल पाठविण्यात आला आहे.

Advertisement

दहशतवाद्यांच्या नावाने फोन करून मंगळूर विमानतळावर स्फोट घडविण्यात येत असल्याची धमकी देण्यात आली आहे. विमानतळ आवारात आणि तीन विमानांमध्ये स्फोटके ठेवण्यात आली आहेत. काही तासातच बॉम्बस्फोट होऊन संपूर्ण देशाला हादरा बसेल आणि रक्तपात होईल, असा संदेश 29 एप्रिल रोजी बाजपे पोलीस स्थानकाला पाठविण्यात आला. त्यात बॉम्बस्फोटाच्या कटामागे टेररायझर्स 111 ही संघटना असल्याचे नमूद करण्यात आले आहे. हे प्रकरण उशिरा उघडकीस आले असून पोलिसांनी धमकीविषयी गुप्तता बाळगून विमानतळ आणि विमानांची तपासणी केली. तसेच विमानतळाच्या पोलीस सुरक्षेत वाढ करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article