For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन

12:50 PM Feb 06, 2025 IST | Tarun Bharat Portal
प्रसिद्ध क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचे दीर्घ आजाराने निधन
Advertisement

ज्येष्ठ क्रिकेट समीक्षक काळाच्या पडद्याआड
मुंबई

Advertisement

लोकप्रिय क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांचं आज दीर्घ आजारानं निधन झालं. ते ७४ वर्षांचे होते. संझगिरी यांनी मुंबईतल्या लीलावती रुग्णालयात अखेरचा श्वास घेतला. क्रिकेट आणि मराठी साहित्यातल्या रुचीनं त्यांच्यातला क्रिकेट समीक्षक घडवला. मराठी क्रिकेटरसिकांनी त्यांच्या लिखाणाला नेहमीच पसंतीची दाद दिली. संझगिरी यांच्या पार्थिवावर उद्या दुपारी 12 वाजता शिवाजी पार्क स्मशानभूमीत अंत्यसंस्कार होतील.
संझिगिरी हे सिव्हील इंजिनिअर होते. मुंबई महानगरपालिकेमध्ये उच्च पदावर नोकरी करत होते. त्यांना क्रिकेट या विषयात विशेष रुची असल्याने क्रिकेट वर लिहीणं, बोलण्याची आवड होती. शिवाय मराठी साहित्यातही त्यांना विशेष रुची होती. त्यामुळे त्यांच्यातील उत्कृष्ट क्रिकेट समीक्षक घडला.
मराठी क्रिकेट प्रेमींनी संझगिरी यांच्या क्रिकेट विषयातील लेखनाला नेहमीच दाद दिली आहे. क्रिकेट या खेळाबद्दल माहिती स्त्रोत, त्यातील वैशिष्ट्यपूर्ण गोष्टींना आपल्या लेखणीने कागदावर उतरवणारा अवलिया माणूस काळाच्या पडद्याआड गेला. यामुळे क्रिकेट विश्वात तसेच क्रिकेट प्रेमींनी हळहळ व्यक्त केली आहे. द्वारकानाथ संझगिरी यांच्या पार्थिवावर शुक्रवारी अंत्यसंस्कार केला जाणार आहे.
द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर हर्षा भोगले यांनी भावूक प्रतिक्रिया सोशल मिडीयावरून प्रसिद्धा केली. हर्षा भोगले म्हणतात, ३८ वर्षांपासून माझा मित्र असणारा माणूस आज जग सोडून गेला आहे. त्याच्या लेखनाचे मला कायम स्मरण राहील. माझा प्रिय मित्र द्वारकारनाथ हा जे कल्पना करायचा तेच त्यांच्या लेखणीतून कागदावर उतरायचं. माझ्या मित्राच्या कुटुंबासह माझ्या सहवेदना.

द्वारकानाथ संझगिरी यांच्या कारकीर्दीविषयी...
द्वारकानाथ संझगिरी यांनी एकाच वेळी दोन क्षेत्रात काम केले. त्यांनी बृहन्मुंबई महानगपालिकेत अभियंता म्हणून नोकरी केली. २००८ मध्ये पाणी पुरवठा प्रकल्पातून मुख्य अभियंता म्हणून निवृत्त झाले. बृन्मुंबई महापालिकेतील नोकरीसोबत संझगिरी यांनी स्तंभलेखक, लेखक आणि सुत्रसंचालक म्हणून स्वतःची एक वेगळी ओळख क्रिकेट विश्वात निर्माण केली. १९७० च्या संझगिरी यांची लेखन कारकीर्द सुरू झाली. त्यांच्या लेखनाच्या सुरुवातीच्या काळात दिनांक आणि श्री यांसारख्या मासिकांमध्ये नियमितपणे लेखन केले. भारताने इंग्लंडमध्ये १९८३ चा विश्वचषक जिंकल्यानंतर, त्यांनी इतर काही मित्रंसह एकच षटकार हे पाक्षिक क्रिडा मासिक सुरु केले. या मासिकाचे संझगिरी हे कार्यकारी संपादक होते.

Advertisement

द्वारकानाथ संझगिरी यांची आजवर ४० पुस्तक प्रकाशित
द्वारकानाथ संझगिरी यांनी १९८३ पासून आजवर झालेले सर्व एक दिवसीय आंतरराष्ट्रीय क्रिकेट वर्ल्ड कप कव्हर केले आहेत. स्तंभलेखनाव्यतिरिक्त, संझगिरी यांनी प्रवास, सामाजिक, क्रिडा विश्व आणि चित्रपट अशा विविध विषयांवर ४० पुस्तके लिहीली आहेत.

आशिष शेलार यांनी ही शोक व्यक्त केला
बीसीसीयाचे कोषाध्यक्ष आशिष शेलार यांनी क्रिकेट समीक्षक द्वारकानाथ संझगिरी यांच्या निधनानंतर शोक व्यक्त केला आहे. शेलार म्हणाले, की संझगिरींच्या निधनाची बातमी ऐकून अतिशय दुःख वाटलं. ते क्रिकेट प्रेमी, क्रिकेटवर रिसर्च करणारे शिवाय क्रिकेट मधील खाचखळग्यांचं ज्ञान असलेले, क्रिकेट विश्वाचा एनसाक्लोपिडीया असलेले, क्रिकेट खेळातील विविध प्रसंगांचे विश्लेषण करणारे हरहुन्नरी मित्र गेल्याचे दुःख झाले आहे.

Advertisement
Tags :

.