Sangli News : मालगाव दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव 4 डिसेंबरला; भक्तिमय कार्यक्रमांची रेलचेल
मालगाव येथे दत्त जयंतीनिमित्त पालखी मिरवणूक
मिरज :मिरज तालुक्यातील मालगाव येथील तानंग रस्त्यावरील दत्त मंदिरात दत्त जयंती उत्सव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. २८ नोव्हेंबरपासून श्री गुरुचरित्र पारायण सोहळा सुरू आहे. याशिवाय हरिपाठ, प्रवचन व भजन कार्यक्रम होत आहेत. गुरूवारी चार डिसेंबर रोजी दत्त जयंती उत्सव होणार आहे.
मालगाव येथील कै. महादेव तवटे यांनी तानंग रस्त्यावरील शेतात २०२१ मध्ये दत्त मंदिर बांधले. तेव्हापासून या मंदिरात दत्त जयंती उत्सव साजरा केला जातो. या मंदिरात येत्या गुरुवारी ४ डिसेंबर रोजी श्री दत्त जयंती साजरी होत आहे.
यानिमित्ताने २८ नोव्हेंबरपासूनसात दिवसांचे गुरुचरित्र पारायण होत आहे. दररोज हरिपाठ, प्रवचन, वाचन, भजन अशा विविध कार्यक्रमांनी परिसर दत्तमय होणार आहे. दत्त जयंती दिवशी सकाळी साडेसहा वाजता श्रींचा अभिषेक, त्यानंतर सकाळी आठ वाजता गावातून पालखी मिरवणूक होणार आहे. यात अनेक भजनी मंडळे, महिला मंडळे, वारकरी दिंड्या आणि लहान मुलांचा सहभाग असणार आहे.
दुपारी महिला भजनी मंडळाचा विशेष कार्यक्रम, तर सायंकाळी साडेपाच दत्त वाजता श्री जन्मकाळाचा सोहळा पार पडेल. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे. प्रसादावेळी कीर्तन, हरिपाठ व भजनांनी वातावरण भक्तिमय होणार आहे.