महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डय़ुसेन-मिलरने हिसकावला विजयाचा घास!

06:30 AM Jun 10, 2022 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पहिल्या टी-20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 7 गडी राखून एकतर्फी विजय, डय़ुसेन-मिलरची तिसऱया गडय़ासाठी 131 धावांची अभेद्य भागीदारी ठरली निर्णायक

Advertisement

वृत्तसंस्था /नवी दिल्ली

Advertisement

इशान किशनने अवघ्या 48 चेंडूत 76 धावांची आतषबाजी केल्यानंतर देखील भारताला  दक्षिण आफ्रिकेविरुद्ध पहिल्या टी-20 सामन्यात पराभवाचा सामना करावा लागला. भारताने निर्धारित 20 षटकात 4 बाद 211 धावांचा डोंगर रचला. मात्र, प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेने 19.1 षटकात 3 बाद 212 धावांसह आश्चर्यकारक विजय संपादन केला. डय़ुसेन (46 चेंडूत नाबाद 75) व मिलर (31 चेंडूत नाबाद 64) आफ्रिकेच्या विजयाचे शिल्पकार ठरले.  

 प्रारंभी, भारतीय संघातर्फे रिषभ पंतने 16 चेंडूत 29 धावा चोपल्या तर हार्दिक पंडय़ा अवघ्या 12 चेंडूत 31 धावा झोडपत नाबाद राहिला. पंत व पंडय़ा यांची स्लॉग ओव्हर्समधील फटकेबाजी निर्णायक ठरली. या जोडीने 46 धावांची भर घातल्यानंतर भारताने 200 धावांचा टप्पा सहज सर केला.

प्रथम फलंदाजीचे निमंत्रण लाभलेल्या भारतीय संघाने प्रारंभापासूनच आक्रमक फलंदाजीवर भर दिला. प्रतिस्पर्धी कर्णधार तेम्बा बवूमाने फिरकीपटू केशव महाराजकडे पहिले षटक सोपवल्यानंतर किशनने लागोपाठ चौकार फटकावत एकूण 13 धावा वसूल केल्या.

बवूमाने नंतर आपली चूक सुधारत स्पीडस्टार कॅगिसो रबाडाला पाचारण केले आणि त्याने षटकात केवळ दोन धावा देत आपली उपयुक्तता अधोरेखित केली. किशन ऍनरिच नोर्त्झेच्या गोलंदाजीवर झगडताना दिसून आला. पण, ऋतुराज गायकवाडने चौकार-षटकार फटकावत धावफलक हलता ठेवला.

गायकवाडला सातव्या षटकात डेव्हॉन प्रिटोरियसने जीवदान दिले. मात्र, तो याचा फारसा लाभ घेऊ शकला नाही. त्याने पार्नेलच्या गोलंदाजीवर मिडविकेटवरील बवूमाकडे झेल दिला. पार्नेलने 2017 नंतर द. आफ्रिकन संघाचे प्रतिनिधीत्व करण्याची ही पहिलीच वेळ होती.

इशान-श्रेयसची उपयुक्त भागीदारी

इशान किशन व श्रेयस अय्यर (36) यांनी फटकेबाजीची मालिका कायम राखली आणि यासह भारताने 9.4 षटकात 100 धावांचा टप्पा सर केला. दक्षिण आफ्रिकन संघाचे खराब क्षेत्ररक्षण भारताच्या पथ्यावर पडणारे ठरले.

संक्षिप्त धावफलक

भारत : 20 षटकात 4 बाद 211 (इशान किशन 48 चेंडूत 11 चौकार, 3 षटकारांसह 76, श्रेयस अय्यर 27 चेंडूत 1 चौकार, 3 षटकारांसह 36, रिषभ पंत 16 चेंडूत 2 चौकार, 2 षटकारांसह 29, हार्दिक पंडय़ा 12 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह नाबाद 31. अवांतर 15. केशव महाराज 1-43, नोर्त्झे 1-36, पार्नेल 1-32, डेव्हॉन प्रिटोरियस 1-35).

द. आफ्रिका : 19.1 षटकात 3 बाद 212 (डय़ुसेन 46 चेंडूत 7 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 75, डेव्हिड मिलर 31 चेंडूत 4 चौकार, 5 षटकारांसह नाबाद 64. क्विन्टॉन डी कॉक 22. भुवनेश्वर, हर्षल, अक्षर प्रत्येकी 1 बळी)

श्रेयस अय्यरने तो झेल सोडला नसता तर?

भारतीय गोलंदाजांसाठी कर्दनकाळ ठरलेल्या डेव्हिड मिलर व डय़ुसेन या जोडीने द्विशतकी आव्हान सहज पार करुन दिले. यादरम्यान श्रेयस अय्यरने डय़ुसेनला दिलेले जीवदान भारतासाठी बरेच महागडे ठरले. डावातील 16 व्या षटकात डय़ुसेन 29 धावांवर असताना अवेश खानच्या गोलंदाजीवर डीप मिडविकेटवर तैनात श्रेयस अय्यरने डय़ुसेनचा सोपा झेल सोडला. नंतर डय़ुसेनने 46 चेंडूत नाबाद 75 धावांची आतषबाजी करत या लढतीचा सारा नूर पालटला.

कोरोनाची बाधा झाल्याने मॅरक्रम लढतीतून बाहेर

दक्षिण आफ्रिकन फलंदाज एडन मॅरक्रम कोरोनाची बाधा झाल्याने भारताविरुद्ध या पहिल्या टी-20 सामन्यात खेळू शकला नाही. अलीकडेच संपन्न झालेल्या आयपीएल स्पर्धेत सहभागी झालेला मॅरक्रम या लढतीत निवडीसाठीही उपलब्ध नव्हता. दक्षिण आफ्रिकन कर्णधार तेम्बा बवूमाने नाणेफेक झाल्यानंतर याची माहिती दिली. मागील आठवडय़ात भारतात दाखल झालेल्या अन्य दक्षिण आफ्रिकन खेळाडूंसह मॅरक्रमने देखील कोरोनाची चाचणी पार केली होती. मात्र, येथे तो खेळू शकणार नसल्याचे गुरुवारी सामन्यापूर्वी स्पष्ट झाले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article