सोने लूट, शस्त्र-वाहनपूजेसह दसरोत्सव उत्साहात
04:23 PM Oct 03, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
पणजी : राज्यात दसरोत्सव पारंपरिक पद्धतीने उत्साहात साजरा झाला. त्यात प्रामुख्याने सोने लुटण्याचा (आपट्याची पाने) कार्यक्रम होता. अनेकांनी दसऱ्याचा मुहूर्त साधून नवीन घरात प्रवेश केला तर काहीजणांनी नवीन दुचाकी, चारचाकी वाहने घेतली. घराघरातून शस्त्रपूजा, वाहनपूजा करण्यात आली. तसेच घरोघरी, दारोदारी आणि वाहनांवर झेंडूच्या फुलांच्या माळा दिसत होत्या. दुकाने व अन्य आस्थापने इत्यादी ठिकाणी कार्यालयातूनही पूजा करण्यात येऊन झेंडू फुलांनी सजावट करण्यात आली होती. बहुतेक मंदिरातून भजन, कीर्तन, आरती तसेच सोने लुटणे व इतर धार्मिक, मनोरंजनाचे कार्यक्रम झाले. महाग असूनही काही जणांनी सोन्याची खरेदी केली.
Advertisement
Advertisement