महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

दुर्गामाता दौडला उद्यापासून होणार प्रारंभ

10:56 AM Oct 02, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

धारकऱ्यांमध्ये अपूर्व उत्साह : शिवरायांचा होणार जयघोष

Advertisement

बेळगाव : देव, देश आणि धर्माच्या रक्षणासाठी चाललेल्या दुर्गामाता दौडला गुरुवार दि. 3 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. यामुळे धारकऱ्यांसह बालकांमध्ये दौडबाबत उत्सुकता वाढली आहे. शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानतर्फे योग्य ती तयारी केली असून दौडबाबतचे नियम पाळून शांततेत सहभागी होण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरासह उपनगरांमध्ये दौडची व्यापकता वाढू लागली आहे. देशप्रेमाची चेतना जागविणाऱ्या दुर्गामाता दौडला उत्साहात प्रारंभ होणार आहे. गुरुवारी पहिल्या दिवशी शिवाजी उद्यान येथे पहाटे विधिवत पूजा, आरती आणि प्रेरणामंत्राने या ऐतिहासिक दौडला सुरुवात होणार आहे. त्यानंतर पहिल्या दिवशीच्या मार्गावर ही दौड मार्गस्थ होणार आहे. याकरिता मार्गस्थ रस्त्यांवर बुधवारी तयारी केली जाणार आहे.

Advertisement

गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी पहिल्या दिवशीचा दौडचा मार्ग ...

श्री छत्रपती शिवाजी उद्यानातून दौडला प्रारंभ होणार आहे. पुढे हुलबत्ते कॉलनी, महात्मा फुले रोड, संतसेना रोड, पाटीदार भवन रोड, शास्त्रीनगर, गुड्सशेड रोड, कपिलेश्वर कॉलनी, शास्त्रीनगर, आठल्ये रोड, महाद्वार रोड क्रॉस नं. 4, माणिकबाग रोड, समर्थनगर, महाद्वार रोड क्रॉस नं. 2 व 3, संभाजी गल्ली, एसपीएम रोडमार्गे कपिलेश्वर मंदिरात सांगता होणार आहे.

दुर्गामाता दौडीत सहभागींनी पाळावयाची शिस्त आणि नियम

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article