येळ्ळूर येथे दुर्गामाता दौड उत्साहात
10:24 AM Oct 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement
येळ्ळूर : येथे दुर्गामाता दौडची सुरूवात लक्ष्मी चौकातील शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून केली. यावेळी संघटनेच्या हस्ते ध्वज व शस्त्र पूजन करून दौडला सुरूवात झाली. दौड येळ्ळूर शिवस्मारक ते राजहंसगड अशी झाली. गडावर सिद्धेश्वर मंदिरात ध्येयमंत्र व आरती करून सिद्धेश्वरांचे पूजन केले. शिवस्मारक येथे दौडची सांगता केली. दि. 4 रोजी दौड गावातील प्रताप गल्ली, सांबरेकर गल्ली, छ. शिवाजी रोड, मारूती गल्ली, लक्ष्मी गल्ली अशी असून लक्ष्मी मंदिर येथे सांगता होईल. शनिवार दि. 5 रोजी छत्रपती शिवाजीनगर, धर्मराज गल्ली, रामदेव गल्ली, ब्रम्हलिंग गल्ली, सुभाष गल्ली अशी असून विठ्ठल-रखुमाई मंदिर येथे सांगता होईल.
Advertisement
Advertisement