महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

डुप्लेंटीसचा पोल व्हॉल्टमध्ये नवा विक्रम

06:55 AM Sep 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

► वृत्तसंस्था /ब्रुसेल्स

Advertisement

2024 च्या अॅथलेटिक हंगामातील येथे शनिवारी सुरू असलेल्या डायमंड लीग अॅथलेटिक्सच्या अंतिम स्पर्धेत  पोल व्हॉल्टर अर्मेंड डुप्लेंटीसने पुरूषांच्या पोल व्हॉल्ट प्रकारात नवा विश्वविक्रम केला. चालु वर्षांच्या हंगामात डुप्लेंटीसने या क्रीडा प्रकारात तीनवेळा विश्वविक्रम मोडीत काढला. पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत त्याने या क्रीडा प्रकारात सुवर्ण पदक पटकाविले होते.

Advertisement

ड्युप्लेंटीसने 25 ऑगस्ट रोजी पोलंडमध्ये झालेल्या डायमंड लीग स्पर्धेत 6.26 मी.ची नोंद करत नवा विश्वविक्रम केला होता. ब्रुसेल्समधील शनिवारी झालेल्या या स्पर्धेतील पोल व्हॉल्ट प्रकारात त्याने 6.11 मी.ची नोंद केली.

पुरूषांच्या 1500 मी. धावण्याच्या शर्यतीत नॉर्वेच्या जेकॉब इंगेब्रिक्सनने पहिले स्थान मिळविताना 3 मिनिटे, 30.07 सेकंदांचा अवधी घेतला. महिलांच्या 100 मी. धावण्याच्या शर्यतीत ऑलिम्पिक चॅम्पियन ज्युलीयन अल्फ्रेडने 10.88 सेकंदाचा अवधी घेत प्रथम स्थान मिळविले. डीना अॅशेर स्मिथ दुसऱ्या तर मारी जोस स्मिथ तिसऱ्या स्थानावर राहिले. जमैकाच्या अकिम ब्लेकने पुरूषांची 100 मी. धावण्याची शर्यत जिंकताना 9.93 सेकंदाचा अवधी घेतला. अमेरिकेच्या कोलमनने दुसरे तर किर्लीने तिसरे स्थान मिळविले. ऑस्ट्रेलियाच्या मॅथ्यु डिनेने पुरूषांच्या थाळीफेकमध्ये 69.96 मी.ची नोंद करत नवा स्पर्धा विक्रम नेंदविला.

अविनाश साबळे नववा

भारताचा राष्ट्रीय विक्रमवीर धावपटू अविनाश साबळेने डायमंड लीग फायनल्समध्ये पुरूषांच्या 3000 मी. स्टिपल चेस प्रकारात नवे स्थान मिळविले. अविनाश साबळे 30 व्या वर्षांत पदार्पण केले. त्याने या क्रीडा प्रकारात 8 मिनिटे 17.09 सेकंदांचा अवधी घेत नववे स्थान मिळविले. या क्रीडा प्रकारात केनियाच्या अॅमोस सिरेमने पहिले स्थान तर विश्वविजेत्या मोरोक्कोच्या बॅकेलीने दुसरे स्थान पटकाविले.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article