वंतिकामुळे भारतीय महिलांची अमेरिकेशी बरोबरी
पुरुष संघाला उझबेकिस्तानने रोखले, प्रथमच बरोबरीवर समाधान मानण्याचा प्रसंग
वृत्तसंस्था/ बुडापेस्ट
आंतरराष्ट्रीय मास्टर वंतिका अग्रवालने अत्यंत गरज असताना मोलाची कामगिरी करून दाखवत ग्रँडमास्टर इरिना क्रशचा पराभव केल्याने भारतीय महिलांना अमेरिकेविऊद्ध 2-2 अशी बरोबरी साधता आली. भारतीय पुऊषांची उझबेकिस्तानबरोबरची लढतही बरोबरीत सुटली. मात्र सध्या ते एकटेच आघाडीवर असून येथे सुरू असलेल्या 45 व्या बुद्धिबळ ऑलिम्पियाडची ही नववी फेरी होती.
भारतीय थिंक टँकने फॉर्मात नसलेल्या ग्रँडमास्टर डी. हरिकाला विश्रांती दिली, परंतु आर. वैशालीला गुलऊखबेगिम तोखिरजोनोव्हाविरुद्ध पराभव पत्करावा लागल्याने परिस्थिती बदलली नाही. दिव्या देशमुखने कॅरिसा यिपविऊद्ध काळ्या सोंगाट्यानिशी खेळताना सामना बरोबरीत सोडविला. चौथ्या पटावर जवळजवळ सर्व गोष्टी तानिया सचदेवच्या बाजूने झुकत होत्या. परंतु लिस ली हिला ती धक्का देऊ शकली नाही आणि शेवटी बरोबरीवर सामाधान मानावे लागले.
या निकालामुळे भारताचे 15 गुण झाले आहेत आणि सुवर्णपदकाच्या संधी जिवंत ठेवण्यासाठी त्यांना शेवटच्या दोन फेऱ्यात विजय नोंदवावे लागतील. कझाकस्तान पोलंडचा 2.5-1.5 असा पराभव करून 16 गुणांनिशी या विभागात आघाडीवर आहे, तर भारत दुसऱ्या स्थानावर आहे. कझाकस्तानची जॉर्जियाविऊद्ध आणखी एक कठीण कसोटी लागेल, तर भारतीय महिलांचा सामना चीनशी होईल.
खुल्या विभागात भारतीय पुऊषांना गतविजेत्या उझबेकिस्तानविऊद्धचे चार सामने अनिर्णीत राहून प्रथमच बरोबरीवर समाधान मानावे लागले. सलग आठ विजयांनंतर नववा विजय त्यांच्या सुवर्णपदकावर जवळपास शिक्कामोर्तब करून गेला असता. त्यात अर्जुन एरिगेसीविरुद्ध प्रतिस्पर्धी शमसिद्दीन वोखिडोव्हने चूकही केली होती. पण एकदा अर्जुन घसरला आणि नंतर शमसिद्दीनने दुसरी संधी न देता सामना बरोबरीत सोडविला. डी. गुकेशचा नोदिरबेक अब्दुसत्तोरोव्हविऊद्धचा, आर. प्रज्ञानंदचा जावोखिर सिंदारोव्हविरुद्धचा तसेच विदित गुजराथीची जाखोंगीर वखिडोव्हविऊद्धचा सामनाही बरोबरीत संपला. भारतीय पुऊषांनी नऊ फेऱ्यांमधून 17 गुण मिळवले आहेत आणि आता यजमान हंगेरीवर 2.5-1.5 असा विजय मिळवणाऱ्या अव्वल मानांकित अमेरिकेविरुद्ध त्यांची महत्त्वाची लढत होईल.