महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पावसामुळे शेतवडीतील रस्त्याची दयनीय अवस्था

10:10 AM Jun 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

शेतकरी वर्गाची मोठ्या प्रमाणात गैरसोय : मोठा पाऊस होण्यापूर्वी रस्ताकाम पूर्ण करण्याची मागणी, कामगारांचा तुटवडा

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

उचगाव परिसरातील शेतवडीत ये-जा करण्यासाठी असलेल्या कच्च्या रस्त्यांची  पावसामुळे चिखल होऊन दयनीय अवस्था झाली आहे. दरवषी शेतकरी वर्गाला सातत्याने याचा त्रास सहन करावा लागत आहे.तरी आता जोरदार पाऊस सुरू होण्यापूर्वी या रस्त्याचे काम पूर्ण करण्यात यावे, अशी मागणी करण्यात येत आहे. दरवषी सदर रस्ता चिखलमय झाल्याने शेतवडीत कसे जायचे, हा मोठा प्रŽ शेतकरी वर्गाला सातत्याने पडत आहे. रस्त्यांच्या खडीकरणासाठी निधी मंजूर करून रस्ते तातडीने करावेत, अशी मागणी शेतकरी वर्गातून गेल्या अनेक वर्षापासून करण्यात येत आहेत.

‘येनवाड’ रस्त्याचे खडीकरण करा

उचगावच्या पूर्वेला तलावापासून मण्णूर गावाला जोडणारा संपर्क रस्ता हा पूर्णत: शेतवडीतून जातो. या भागात हजारो एकर सुपीक जमीन असून भात, ऊस, भाजीपाला, बटाटा, मिरची अशी अनेक पिके खरीप व रब्बी हंगामात घेतात. मात्र सदर रस्त्यावरून सध्या चालणे देखील मुश्कील झाले आहे. चिखलामुळे शेतवडीत  कसे जायचे, याची चिंता शेतकरी वर्गाला लागून आहे. याबरोबरच मार्कंडेय नदी परिसरात ‘येनवाड’ या शेतवडीत जाणारा महत्त्वाचा गाडीमार्ग आहे. या रस्त्यावरून ट्रॅक्टर, ट्रक उन्हाळ्यात ये-जा करतात. मात्र सदर रस्त्याचे खडीकरण व डांबरीकरण करणे गरजेचे आहे. मात्र सदर रस्त्याकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. उन्हाळ्यात भाताची ने आण व उसाची तोडणी झाल्यानंतर पॅक्टरीपर्यंत ऊस पोहोचवण्यासाठी या रस्त्याचा उपयोग केला जातो. त्यासाठी रस्ता व्यवस्थित होण्याची गरज आहे.

चारा आणण्यासाठी पक्के रस्ते हवेत

अनेक शेतकरी शेती व्यवसायाबरोबरच दुग्ध व्यवसायदेखील मोठ्या प्रमाणात करतात. या जनावरांना चारा शेतवडीतून डोकीवरून आणणे तेही चिखलातून मुश्कील व कष्टदायक आहे. उन्हाळ्यात व पावसाळी हंगामात शेतात काम करत असताना शेतीची अवजारे, बी बियाणे, खताची ने-आण करावी लागते. पक्के रस्ते नसल्याने साहित्याची डोकीवरूनच ने-आण करावी लागते. तऊण पिढीला अशा अवघड कामामुळे शेती व्यवसाय नकोसा झाला आहे.

कामगारांच्या कमतरतेमुळे शेती झाली नकोशी

पूर्वीच्या काळात 90 टक्के शेतकरी भातपेरणी करत होती. मात्र हल्ली पेरणी थांबली व भाताच्या रोप लागवडीवर भर देण्यात आला आहे. रोप लागवड काळात चिखल व पाऊस यामुळे शेतात जाणे कंटाळवाणे व कष्टाचे वाटत असल्याने भात लागवडीवर याचा मोठा परिणाम जाणू लागला आहे. कामगारांची संख्या घटत आहे. शेतात जाण्यापेक्षा काजू पॅक्टरी व इतर व्यवसाय करण्याकडे महिला व पुऊषांचा कल दिसून येत आहे, मग शेती व्यवसाय कामगाराविना कसा करावा?

- परशराम अण्णू चौगुले

लोकप्रतिनिधींनी शेतकऱ्यांचे हाल थांबवावेत

एपीएमसीकडे शेतवडीतील रस्त्यांसाठी निधी असतो. मात्र तो खर्च केला जात नाही. यासाठी सदस्यांनी प्रत्येक भागासाठी किती निधी मिळतो याचा अभ्यास करून त्या त्या भागातील शेतवडीतील रस्ते करावेत. तसेच लोकप्रतिनिधींनीसुद्धा निधी मंजूर करून शेतवडीत जाणारे रस्ते तयार करावेत. शेतवडीतील रस्त्यांसाठी निधी मंजूर करावा आणि शेतकऱ्यांचे हाल थांबवावेत.

- योगेश गिरी

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article