Sangli : सांगलीत जिल्हा बँकेच्या निर्णयामुळे ग्राहकांचे व्यवहार ठप्प ; सहा लाख ग्राहक अडचणीत
सांगलीत ग्राहकांचा संताप; बँकेच्या खात्यांवर अचानक ब्लॉकिंगमुळे वादावादी
सांगली : कोणाला पेट्रोल पंपावर इंधन भरल्यानंतर आपले एटीएम कार्ड ब्लॉक असल्याचे लक्षात आले. कोणाला बाजारात खरेदी केल्यानंतर पैसे देण्यासाठी एटीएमचा वापर करता आला नाही. दवाखाना, अचानक आलेली अडचण सोडवण्यासाठी अनेकांना आर्थिक नाकेबंदीला तोंड द्यावे लागले. जिल्हा बँकेने अचानक केवायसी च्या नावाखाली खातेदारांची खाती ब्लॉक केल्यामुळे ग्राहकांना दोन दिवसापासून त्रास सहन करावा लागत आहे.
त्यामुळे ही केवायसीसाठी बँकेच्या सर्वच शाखांमध्ये ही ग्राहकांची झुंबड उडाल्याचे चित्र आहे. बँकेच्या अडवणुकीच्या धोरणामुळे ग्राहकातून तीव्र संताप व्यक्त होत आहे. ज्या ग्राहकांनी ही केवायसी केलेली नाही अशा सहा लाख ग्राहकांची बैंक खाते जिल्हा बँकेने ब्लॉक केले आहेत. त्यामुळे या सर्व खात्यावरील व्यवहार ठप्प आहेत. केवायसी करण्यासाठी शनिवारी आणि रविवारी ही बँकेच्या सर्व शाखा सुरू ठेवल्या होत्या. परंतु नागरिकांची आर्थिक नाकेबंदी झाल्याने बँकेत दोन्ही दिवस ग्राहकाने कर्मचाऱ्यांमध्ये वादावादीचे प्रसंग सुरू झाले आहे.
रविवारी अनेक ग्राहकांनी बँकेच्या वरिष्ठ अधिकायांनाही भ्रमणध्वनीवरून याबद्दल जाब विचारला. केवायसीसाठी ग्राहकांना कळवणे बंधन-कारक आहे परंतु बैंकने खाती लॉक करून एसएमएस केले आहेत बऱ्याच ग्राहकांना हे एसएमएस पोचलेले नाही त्याचबरोबर शाखा पातळीवर ग्राहकांना याची कल्पना देणे आवश्यक असतानाही त्याकडे दुर्लक्ष करत थेट बैंक खाते लॉक केल्याने अ-नेक नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. या विरोधात ग्राहकांनी सहकार विभागाकडे तक्रार करण्याचा इशारा वरिष्ठ अधिकायांना दिल्याचे समजते.