कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पोलिसांच्या अॅक्शनमुळे ऊस वाहतूक ठेकेदारांना प्रोटेक्शन

12:04 PM Mar 17, 2025 IST | Radhika Patil
Advertisement

कोल्हापूर / आशिष आडिवरेकर : 

Advertisement

जिल्ह्यातील ऊस वाहतूक ठेकेदारांना ऊस तोडणी कामगार पुरविण्यासाठी अॅडव्हान्स घेऊन फसवणूक केलेल्या मुकादमांविरोधात कोल्हापूर पोलीस अॅक्शन मोडवर आले. गतहंगामात फसवणूक केलेल्या 1119 मुकादमांवर गुन्हा दाखल केला गेला. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचा धसका मुकादमांनी घेतला आहे. परिणामी यंदाच्या हंगामात मुकादमांकडून जिल्ह्यातील ऊस वाहतूक ठेकेदाराची फसवणूक झालेली नाही. मुकादमांकडून आर्थिक फसवणूक झाल्याची एकही तक्रार पोलिसांकडे आलेली नाही. गत हंगामात गुन्हे दाखल झालेल्या 1119 मुकादमां पैकी 1083 मुकादमांविरोधात दोषारोपपत्र दाखल केले आहे.

Advertisement

साखर कारखान्यांना उसपुरवठा करणाऱ्या वाहतूकदारांनाच ऊसतोड करणाऱ्या टोळींची जुळवाजुळव करावी लागते. या टोळ्या बीड, परभणी, जालना, यवतमाळ या जिह्यातून येतात. पूर्वी ठेकेदार थेट टोळ्यांशी संपर्क साधत होते. आता मात्र मुकादमाची संकल्पना निर्माण झाली आहे. ठेकेदारांना हे मुकादम उस तोड मजुरांच्या टोळ्या पुरवतात. टोळ्या निश्चित करण्यासाठी कारखाने सुरु होण्यापूर्वीच संबंधित मुकादमांना लाखो रुपयांची अॅडव्हान्स दिली जाते.

गेल्या काही वर्षात मुकादमांकडून ठेकेदारांच्या फसवणुकीचे प्रमाणात वाढ झाल्याने तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी फसवणूक झालेल्या ठेकेदारांना मुकदमांविरोधात तक्रार देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार जिल्ह्यातून 443 तक्ररी दाखल केल्या. त्यानंतर आजपर्यंत 1119 तक्रारी दाखल झाल्या आहेत. यामधून जिल्ह्यातील ऊस वाहतूक ठेकेदारांची सुमारे 130 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचे समोर आले आहे.

पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत यांनी या फसवणुकीच्या गुह्यांचा तपास करण्यासाठी एका स्वतंत्र पथकाची नेमणूक केली. या पथकाने बीड, परळी, परभणी, यवतमाळ, माजलगांव येथे जाऊन आरोपींना अटक केले. तसेच 119 गुह्यांपैकी 1083 गुह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल केले. यामध्ये कोणत्याही प्रकारच्या त्रुटी राहू नयेत यासाठी स्वत: पोलीस अधीक्षकांनी यामध्ये लक्ष घालून कागदपत्रांची छाननी केली.

राज्यातील ऊस टप्प्यात फसवणूक करणाऱ्या मुकादमांविरोधात तत्कालीन पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी प्रथमच अशी मोहीम राबविली. यानंतर या फसवणुकीची व्याप्ती मोठी असल्याने पोलीस अधिक्षक महेंद्र पंडीत यांनी या फसवणुकीच्या घटनांचा सखोल तपास केला. यामुळे यंदाच्या हंगामात फसवणुकीच्या गुह्यांचा आकडा शुन्यवर आला कोल्हापूर पोलिसांनी हाच पॅटर्न सांगली, साताऱ्यासह संपूर्ण राज्यातील पोलीस दलाकडून राबविण्यात आला.

विभाग           दाखल गुन्हे                     आरोपी                       फसवणुकीची रक्कम

शहर                      8                               17                       1 कोटी 86 लाख 54 हजार

करवीर                 496                           889                       87 कोटी 84 लाख 72 हजार

शाहूवाडी             105                            176                         7 कोटी 10 लाख 4 हजार

इचलकरंजी           74                             78                          5 कोटी 84 लाख 21 हजार

जयसिंगपूर           171                         216                         11 कोटी 67 लाख 57 हजार

गडहिंग्लज            259                        329                           16 कोटी 14 लाख 23 हजार

एकूण                  1113                      1705                         130 कोटी 47 लाख 33 हजार

2023 मध्ये दाखल गुन्हे : 1 हजार 119

फसवणुकीची रक्कम : 130 कोटी 47 लाख

निष्पन्न आरोपी : 1 हजार 793

अटक आरोपी : 190

दोषारोपपत्र दाखल : 1 हजार 82

ऊस तोडणी मजूर पुरविणाऱ्या मुकादमांकडून ऊस वाहतूक ठेकेदारांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक होत असल्याने कोल्हापूर पोलिसांनी विशेष मोहीम राबविली होती. यामध्ये 1 हजार 82 गुह्यांमध्ये दोषारोपपत्र दाखल केले असून, उर्वरीत 37 गुह्यांचेही दोषारोपपत्र लवकरच दाखल केले जाणार आहे. या विशेष धडक कारवाईमुळे यंदाच्या हंगामात उस वाहतूक ठेकेदारांची फसवणुकीचे प्रमाण घटले आहे.

                                                                                         पोलीस अधीक्षक महेंद्र पंडीत

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article