दुष्काळामुळे नदीपात्रात दिसले मानवी चेहरे
अमेझॉन रेनफॉरेस्टमध्ये मानवी चेहऱ्यांच्या अजब आकृती दिसून आल्या आहेत. या आकृती नीग्रो नदीच्या पाण्याखाली असलेल्या खडकांवर आहेत. दुष्काळामुळे आता त्या पुन्हा जगासमोर आल्याह आहेत. यापूर्वी हे आर्टवर्क 2010 मध्ये दिसून आले होते आणि ते देखील केवळ एका दिवसासाठी. वैज्ञानिकांनी या मानवी चेहऱ्यांना पाहिल्यावर ते दंगच झाले. वैज्ञानिक आता या आकृतींचा अर्थ समजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. लवकरच या प्राचीन रहस्याची उकल करता येईल अशी अपेक्षा वैज्ञानिकांना आहे.
प्राचीन मानवी चेहऱ्यांच्या आकृती ब्राझीलच्या मनौसनजीक नदीच्या तळाला आढळून आल्या आहेत. रियो नीग्रो आणि अमेझॉन नदीच्या संगमानजीक याचा शोध लागला आहे. नीग्रो नदी ही अमेझॉन नदीची उपनदी आहे. याचा स्रोत कोलंबियात असून व्हेनेझुएला आणि मग ब्राझीलच्या अमेझॉन जंगलात ही वाहते. याचे मुख मनौस शहरात आहे.
मानवी चेहऱ्यांसोबत कलाकृती पाणी आणि प्राण्यांनाही दर्शवितात. एंशिएंट ओरिजिन्सच्या अहवालानुसार ब्राझीलमध्ये अलिकडच्या काळात या आकृती दिसुन आल्या असून त्यांना पेट्रोग्लिफ्स म्हटले जाते. या मानवी चेहऱ्याच्या आकृती कुऱ्हाडीने तयार करण्यात आल्या असाव्यात असे तज्ञांचे मानणे आहे. या आकृतींमध्ये सर्वांची तोंड आहेत, परंतु काहींमध्ये नाक गायब आहे. ब्राझीलियन इन्स्टीट्यूट ऑफ हिस्टोरिकल हेरिटेजचे जॅमे ओलिवेरा यांनी ही चित्रे कॉम्प्लेक्स ग्राफिक आर्ट असल्याचे सांगितले आहे. आकृतींमध्ये आनंदी आणि उदास दोन्ही प्रकारचे चेहरे आहेत. शिकारी आणि शिकार यांना दर्शविणाऱ्या या आकृती असल्याचे मानले जाते.
वैज्ञानिक या अजब मानवी चेहऱ्यांच्या आकृतींवरून आश्चर्यचकित आहेत. कधीकाळी नागरी वस्ती असलेल्या स्थानी या आकृती तयार करण्यात आल्या असाव्यात असे मानणे आहे. प्राचीन अमेझॉनवासीयांनी दुष्काळाच्या काळात आमच्यापेक्षा अधिक गंभीर स्थितीला तोंड दिले असावे असे ओलिविरा यांचे सांगणे आहे. पुढील महिन्यात रियो नीग्रोमधील पाणीपातळी वाढण्याची शक्यता असल्याने या आकृती पुन्हा पाण्यात बुडून जातील. याचमुळे तज्ञांनी या आकृतींना पूर्णपणे डॉक्यूमेंटेड करण्यासाठीचे प्रयत्न गतिमान केले आहेत.