कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पश्चिम भागात दाट धुक्मयामुळे काजू मोहोराला हवामानाचा फटका

10:01 AM Feb 03, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

मोहोर काळा पडत असल्याने उत्पादनात कमालीची घट शक्य : शेतकरीवर्ग चिंतेत, शासनाकडून मार्गदर्शनाची गरज : ऐन फळधारणेवेळी संकट

Advertisement

वार्ताहर /उचगाव

Advertisement

बेळगावच्या पश्चिम भागातील शेतकऱ्यांना आर्थिक दिलासा देणाऱ्या काजू उत्पादनाला आता अलीकडे तुरळक लागवडीला सुऊवात झाली आहे. परंतु सकाळी पडत असलेल्या दाट धुक्मयामुळे व थंडीमुळे काजूचा मोहोर जळून काळा पडत आहे. परिणामी काजू उत्पादनात कमालीची घट होण्याची शक्मयता असल्याचे बागायतदार, शेतकरी वर्गातून बोलले जात असून, सर्वांमध्ये चिंतेचे सावट पसरले आहे. बेळगावच्या पश्चिम भागामध्ये काजू, आंबा पिकांचे उत्पादन चांगले भरघोस येते. या पिकाला पोषक अशी जमीन, हवामान या भागात मिळत असल्याने मोठमोठ्या काजू, आंब्याच्या बागा या परिसरात दिसून येतात. काजू पीक आर्थिकदृष्ट्या महत्त्वाचे मानले जाते. शेतकऱ्यांना वरदान ठरणाऱ्या या पिकामुळे शेतकऱ्यांच्या जीवनात परिवर्तन होत आहे. या परिसरातील उचगाव, बेकिनकेरे, अतिवाड, बसुर्ते, कोनेवाडी, कल्लेहोळ, कुद्रेमनी, राकसकोप, बेळगुंदी, सावगाव, मंडोळी, हंगरगा, सोनोली, बाकनूर आदी ठिकाणी प्रतिवषी काजूचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते.

 मोहोर जळून खाक

या परिसरात जवळजवळ सर्वच शेतकरी काजू बागायतदार आहेत. त्यांना काजू पिकामुळे दरवषी हजारो ऊपयांचे उत्पादन मिळते. कमीत कमी कालावधीत अधिक उत्पादन मिळवून देणारी ही पिके आहेत. याची वैशिष्ट्या म्हणजे या पिकाला विशेष असा खर्च नसल्याने पडीक जमिनीतसुद्धा उत्पादन घेता येते. त्यामुळे या परिसरात अधिकाधिक काजू बागायतदार दिसून येतो. मात्र गेल्या काही दिवसात मोहोर तरारून आलेला असतानाच दाट धुक्मयाच्या प्रभावामुळे काजू झाडांना आलेला मोहोर जळून काळा पडून नुकसान होत असल्याचे चित्र या भागात दिसून येत असल्याने शेतकरी वर्ग चिंतेत पडला आहे. तालुक्मयातील काजूला देशासह प्रदेशातही मागणी आहे. या भागात अनेक बागायती असल्यामुळे उन्हाळ्यातील तीन महिने हे पीक घेण्यातच जातात. या पिकातून मिळणाऱ्या पैशातून पेरणी हंगाम, तसेच इतर व्यवसाय यातून भागविले जातात, शेतीचे अनेक व्यवहारसुद्धा याच व्यवसायावर साधण्यात येतात. यंदा चांगल्या प्रकारे मोहोर आला होता. पण ऐन फळधारणेच्या काळातच धुके पडल्यामुळे मोहोर जळून गेला आहे. मोहोरातून बाहेर पडलेला काजूही काळपट होत आहे, असे शेतकरी वर्गाचे व बागायतदारांचे म्हणणे आहे. परिणामी यावषीही सदर पीक धोका देते की काय? असे बागायतदार, शेतकऱ्यांतून सांगण्यात येत आहे. त्यामुळे या हंगामात काजू उत्पादनात घट होण्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे.

औषध फवारणीची गरज

गेल्या काही दिवसापासून पडत असलेल्या धुक्मयापासून बचाव करण्यासाठी बागायत कृषी खात्याने मदत करावी, औषध फवारणीबाबत मार्गदर्शन करावे, अशीही मागणी शेतकऱ्यांतून करण्यात येत आहे. या भागातील अनेक मोठमोठ्या बागायतदारांनी यापूर्वीच काजू पिकाच्या मोहोरावर विपरीत परिणाम होऊ नये यासाठी औषधांची फवारणी करण्यात आलेली आहे. मात्र शासनाकडूनसुद्धा याबाबत योग्य ते मार्गदर्शन करणे गरजेचे आहे, असे शेतकरी, बागायतदारांचेही म्हणणे आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article