कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

हवेत रिसॉर्ट तयार करणार दुबई

06:07 AM Feb 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

5 लाख चौरस फूटांमध्ये फैलावलेले असेल, 47 अब्ज रुपयांची योजना

Advertisement

दुबई आकर्षक लाइफस्टाइल आणि आलिशान स्काय स्क्रॅपर्ससाठी ओळखली जाते. येथे जगातील सर्वात उंच इमारत बुर्ज खलिफा समवेत एकाहून एक सुंदर इमारती आणि रिसॉर्ट आहेत. आता दुबईत आणखी एक अनोखे रिजॉर्ट तयार केले जाईल. दुबईत आकाशाला भिडणारे एक आकर्षक रिसॉर्ट तयार करण्याची घोषणा करण्यात आली आहे.  लवकरच जबील पार्कमध्ये ‘थर्मे दुबई’ नावाने सर्वात उंच वेल-बीइंग रिसॉर्टच्या निर्मितीला सुरुवात होईल. हे स्थापत्यकलेचा एक अद्भूत नमुना असेल. हे भव्य रिजॉर्ट 100 मीटरच्या उंचीवर निर्माण केले जाणार आहे.

Advertisement

2028 पर्यंत होणार निर्मिती

या रिसॉर्टचा एक थ्रीडी व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करण्यात आला आहे. या व्हिडिओत भविष्यातील या आलिशान रिजॉर्टची वैशिष्ट्यो दाखविण्यात आली आहेत. याच्या आतील आणि बाहेरील रचना कशाप्रकारची असेल, हे किती मोठे असेल, यात कोणकोणती वैशिष्ट्यो असतील हे सर्वकाही यात दाखविण्यात आले आहे. हे रिसॉर्ट 2028 मध्ये सुरू होणार आहे.

युवराजांकडून घोषणा

दुबईचे युवराज शेख हमदान बिन मोहम्मद बिन राशिद अल मकतूम यांनी या रिसॉर्टची घोषणा केली आहे. हे रिसॉर्ट 500 हजार चौरस फुटाच्या क्षेत्रात फैलावलेले असेल, यात तीन क्षेत्रं असतील, जी रेस्टोरेशन, आराम आणि खेळावर केंद्रीत असतील. यात एक इंटरॅक्टिव्ह गार्डन देखील असणार आहे. हा इनोवेटिव्ह प्रोजेक्ट शहरी जैवविविधता, पर्यावरणीय स्थिरतेला वाढविणे आणि दुबईवासीय तसेच पर्यटकांसाठी अनोखा अनुभव देण्याची आमची प्रतिबद्धता दर्शवितो. हा रिसॉर्ट 2028 पर्यंत निर्माण होणार असल्याचे युवराजांनी म्हटले आहे.

अब्जावधी रुपयांचा खर्च

सरकारने नव्या लँडमार्कच्या विकासासाठी 2 अब्ज दिरहम (47 अब्ज रुपये) इतका निधी उपलब्ध करून दिला आहे. रिसॉर्टमध्ये एक इंटरॅक्टिव्ह पार्क आणि जगातील सर्वात मोठे इनडोअर बॉटिनिकल गार्डन असेल आणि हे वार्षिक 17 लाख पर्यटकांना सेवा पुरविणार आहे.

रिसॉर्टमध्ये 200 हून अधिक पार्क

या रिजॉर्टची योजना दुबई क्वालिटी ऑफ लाइफ स्ट्रॅटेजी 2033 अंतर्गत तयार करण्यात येत आहे. याचा उद्देश दुबईला वास्तव्यासाठी जगातील सर्वात चांगले शहर करणे आहे. या प्रकल्पात 200 हून अधिक पार्कांचा विकास, सागर किनाऱ्यावर सायकलिंग ट्रॅकचा विस्तार, सागर किनाऱ्यांची लांबी वाढविणे आणि विशेषकरून महिलांसाठी नवे समुद्र किनारे निश्चित करणे सामील आहे.

3000 हून अधिक वृक्षांची लागवड

प्रकल्पाच्या महत्त्वाच्या हिस्स्यात प्रत्येक रेसिडेन्शियल कम्युनिटी लँडस्केप आणि विशिष्ट आर्किटेक्चर प्रवेशद्वार देखील असतील. 3 हजाराहून अधिक वृक्ष आणि रोपांची लागवड केली जाईल. हे दुबईत 2024 मध्ये लावण्यात आलेल्या 216500 वृक्षांच्या व्यतिरिक्त असतील.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article