For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

डु प्लेसिसने दिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत

06:22 AM Dec 07, 2023 IST | Tarun Bharat Portal
डु प्लेसिसने दिले आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पुनरागमनाचे संकेत
Advertisement

वृत्तसंस्था/ जोहान्सबर्ग

Advertisement

दक्षिण आफ्रिकेचा माजी कर्णधार फाफ डु प्लेसिस अनेक वर्षांपासून संघाबाहेर आहे पण, आता तो लवकरच पुनरागमन करू शकतो. त्याने याबाबतचे संकेत दिले आहेत. पुढील वर्षी आयसीसीचा टी-20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिकेत होणार आहे आणि ही स्पर्धा लक्षात घेऊन 39 वर्षीय खेळाडू आणि दक्षिण आफ्रिका व्यवस्थापन यांच्यात नुकतीच चर्चा झाली.

डु प्लेसिसने 2020 मध्ये दक्षिण आफ्रिकेसाठी शेवटचा टी-20 सामना खेळला होता, तर 2021 पासून तो आंतरराष्ट्रीय क्रिकेट खेळलेला नाही. परंतु, तो जगभरातील फ्रँचायझी क्रिकेटचा सातत्यपूर्ण भाग आहे आणि त्याने यामध्ये सातत्याने चांगली कामगिरी करताना आपली झलक दाखवून दिली आहे. आयपीएलमध्ये तो रॉयल चॅलेंजर्स बेंगळूरचा कर्णधारही आहे. अलीकडेच भारताविरुद्धच्या आगामी दौऱ्यासाठी संघाची घोषणा करताना, दक्षिण आफ्रिकेचे प्रशिक्षक रॉब वॉल्टर यांनी डु प्लेसिसच्या पुनरागमनाचे दरवाजे बंद नसल्याचे संकेत दिले होते. उभयतांत बंद दरवाजाआड चर्चा झाली असून यामधील तपशील मात्र समजू शकलेला नाही.

Advertisement

डु प्लेसिस याबाबत म्हणाला की, मी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्येही पुनरागमन करु शकतो. पुढील वर्षी होणाऱ्या टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी मी उत्सुक आहे. याबाबत नवीन प्रशिक्षकाशींही मी बोललो आहे. तुमचे वय जसजसे वाढत जाते, तसतसे तुम्हाला तुमच्या फिटनेसवर अधिक मेहनत करावी लागते. वाढत्या वयामुळे हॅमस्ट्रिंग आणि शरीराचे इतर अवयव देखील काम करू शकत नाहीत. अशा स्थितीत तंदुरुस्त राहण्यासाठी एक उत्तम गोष्ट आहे. पुढील वर्षी होणाऱ्या वर्ल्डकपसाठी माझे प्रयत्न सुरु असल्याचे त्याने यावेळी सांगितले. दरम्यान, त्याच्या पुनरागमनासाठी कोणती मालिका निवडली जाते हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.

Advertisement
Tags :

.