संविधान बचावासाठी डीएसएस (आर) करणार आंदोलन
बेळगाव : आजकाल दलितांवर अत्याचार वाढला असून मनुवादी विचारसरणी वाढली आहे. दलित समाजाला सामाजिक, राजकीय व शैक्षणिकदृष्ट्या डावलले जात आहे. मंत्री मल्लिकार्जुन खर्गे व प्रियांका खर्गे आणि त्यांच्या कुटुंबीयांना जाणीवपूर्वक लक्ष्य केले जात असून त्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे. यासाठी त्यांना संरक्षण देण्यात यावे. रा. स्व. संघाच्या कृतींच्या निषेधार्थ व संविधान बचावासाठी राज्यभरात आंदोलन करण्यात येणार असून मनुवादींवर तात्काळ आळा घालण्याची मागणी राज्य दलित संघर्ष समिती (आर) च्यावतीने करण्यात आली. याबाबतचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. दलित समुदायातील अनेक लोक उच्चपदावर कार्यरत असून त्यांच्यावर हल्ले करण्यात येत आहेत. रा. स्व. संघ संविधानाच्या चौकटीत राहून कार्य केले पाहिजे. पुढील पिढीच्या उज्ज्वल भविष्यासाठी संविधान व लोकशाहीचे रक्षण करणे सर्वांचे कर्तव्य आहे. खासदार विश्वेश्वर हेगडे यांनी राष्ट्रगीताचा अपमान केला असून हास्यास्पद विधान केले आहे. यामुळे राज्य सरकारने त्यांना तात्काळ अटक करून त्यांच्यावर कठोर कारवाई करण्याची मागणीही करण्यात आली.