महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

एफआयआर नोंदविण्यास आलेल्या महिलेला घेऊन DSP गेला बाथरुमच्या दिशेने

04:25 PM Jan 04, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement

संबंधित DSP रामचंद्रप्पा निलंबित
३५ सेकंदाचा व्हिडीओ व्हायरल
मधुगिरी (टुमकुरू)
.. तर घडलं असं, कर्नाटक पोलिस अधिकाऱ्याचा एक व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडिओशी संबंधित महिला गुरुवारी काही जणांसह मधुगिरी पोलिस ठाण्यात तक्रार देण्यासाठी आली होती. DSP रामचंद्रप्पाने या महिलेशी बोलत बोलता ओळख वाढविली आणि महिलेला बाजुला घेऊन गेले. यानंतर व्हिडिओनुसार हे दोघेही पोलिस ठाण्याच्या एका कोपऱ्यात जाताना दिसले. त्या कोपऱ्याच्या शेवटी एक बाथरुम आहे, असे व्हायरल झालेल्या व्हिडिओतुन लक्षात येते.

Advertisement

पोलिसांनी संबंधित प्रकरणी दिलेली माहिती अशी, पोलिस अधिकारी महिलेला घेऊन बाथरुममध्ये गेले आणि अश्र्लिल कृत्य केले. दरम्यान कोणीतरी मोबाईल बाथरूमच्या खिडकीवर ठेवून या कृत्याच्या व्हिडिओ रेकॉर्ड केला. मात्र हे रेकॉर्डींग ३५ सेकंदावरच थांबले. त्यानंतर संबंधित महिला व्हिडिओ रेकॉर्डींग होतानाचा पाहून DSP रामचंद्रप्पाच्या मागे लपल्याचे दिसत आहे.

Advertisement

या प्रकरणी आता कर्नाटक सरकारने शुक्रवारी तुमकुरू जिल्ह्यातील मधुगिरी येथील पोलिस उपाअधीक्षक (DSP) बी रामचंद्रप्पा यांना निलंबित केले. गुरुवारी रात्री हा व्हिडिओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला. या व्हिडिओमध्ये संबंधित महिला आणि DSP रामचंद्रप्पा दिसत आहे.

याप्रकरणी तुमकुरूचे एस पी अशोक यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, ते वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांच्या निदर्शनास ही बाब आणून योग्य कारवाई करतील.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी एसपींनी घटनेचा अहवाल पोलिस महानिरीक्षकांना सादर केला. आयजीपींनी तो पोलिस महासंचालक आणि पोलिस महानिरीक्षक आलोक मोहन यांना पाठवला. त्यानंतर रामचंद्रप्पा यांना शुक्रवारी संध्याकाळी निलंबित करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article