For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

सकाळी शुकशुकाट तर दुपारनंतर मतदानास वेग

12:56 PM Nov 21, 2024 IST | Radhika Patil
सकाळी शुकशुकाट तर दुपारनंतर मतदानास वेग
Dry morning, but voting picks up pace after afternoon
Advertisement

राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरीत चुरशीने मतदान: टाकाळा मतदान केंद्रावर क्षीरसागर-लाटकर कार्यकर्त्यात वादावादी
कोल्हापूर
उत्तर मतदार संघातील राजारामपुरी, शाहूपुरी, लक्ष्मीपुरी, व्यापारपेठ, टाकाळा मतदान केंद्रावर अत्यंत चुरस व इर्षेने मतदान झाले. या चारही मतदान केंद्रावर सकाळच्या सत्रात काही अंशी शुकशुकाट पहायला मिळाला. दुपारी 12 पर्यंत 25 ते 30 टक्क्यापर्यंत मतदान झाले होते. मात्र, दुपारनंतर सायंकाळपर्यंत मतदानाला वेग आल्याचे चित्र दिसून आले.
विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्यातील 10 मतदार संघातून 121 उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत. उत्तर मतदार संघात शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार राजेश क्षीरसागर व महाविकास आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्यात थेट लढत असल्याने मतदनाची चुरस पहायला मिळाली. लक्ष्मीपुरी सुसर बाग परिसरातील मतदान केंद्रावर कर्मचाऱ्यांना चहा, नाष्टा व जेवनाची सोय झाली नव्हती. गैरसोय झाल्याने कर्मचाऱ्यांनी नाराजी व्यक्त केली. याची वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती मिळताच कर्मचाऱ्यांची व्यवस्था करण्यात आली.
महिला वर्गाने घरातील कामे आटोपून मतदान केंद्रावर जाणे पसंत केले. बहुतांश कर्मचाऱ्यांना दुपारनंतर सुटी असल्याने दुपारी केंद्रावर गर्दी झाली होती. त्यामुळे सकाळच्या सत्रात मतदान रेंगाळले होते. दुपारी 12 पर्यंत 35 टक्केही मतदान झाले नव्हते. लक्ष्मीपुरीतील छत्रपती शिवाजी तंत्रनिकेतन मतदान केंद्रात 30 टक्के, डॉ. जाकीर हुसेन उर्दु-मराठी स्कूलमध्ये 35 टक्के, राजारामपुरीतील छत्रपती राजाराम महाराज विद्यालयात 32 टक्के, आर. के. वालावलकर प्रशाला 40 टक्के मतदानाची नोंद झाली होती. दुपारनंतर मात्र सर्वच मतदान केंद्रात गर्दी झाली होती. दुपारनंतर महिला व नोकरदारांनी उत्स्फुर्तपणे मतदान केले. दुपारनंतर मतदानाचा टक्का वाढला असल्याचे मतदान केंद्रातील अधिकाऱ्यांनी सांगितले.

Advertisement

मतदान केंद्रावर मोबाईल बंदी, काही ठिकाणी वादावादी

निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी मतदान केंद्रावर मोबाईल वापरण्यास बंदी घातली होती. तरीही काही मतदारांनी चोरी छुपे मोबाईल नेऊन मतदानाचे चित्रिकरण केले. याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्याने पोलिसांनी कडक कारवाई करत प्रत्येक मतदाराची तपासणी सुरू केली. ज्यांच्याकडे मोबाईल आढळुन आले त्यांना मोबाईल बाहेर ठेवूनची मतदाना केंद्रावर प्रवेश दिला.

Advertisement

क्षीरसागर-लाटकर कार्यकर्त्यांत वादावादी
भाजप महायुतीचे उमेदवार राजेश क्षीरसागर व महायुती पुरस्कृत अपक्ष उमेदवार राजेश लाटकर यांच्या कार्यकर्त्यांमध्ये टेंबलाईनाका येथील टाकाळा मतदान केंद्रावर वादावादीचा प्रकार घडल्याचे कार्यकर्त्यांनी सांगितले. लाटकर यांचे कार्यकर्ते टाकाळा परिसरातील नागरिकांना मतदानाचे आवाहन करत होते. दरम्यान, यावेळी क्षीरसागरही दाखल झाले. क्षीरसागर व लाटकर यांचे कार्यकर्ते समोर येताच शाब्दीक वाद झाला. यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला होता. पोलिसांनी हस्तक्षेप करत दोन्ही गटातील कार्यकर्त्यांना शांत केले. क्षीरसागर निघून गेल्यानंतर शिवसेना ठाकरे गटाचे शहराध्यक्ष रविकिरण इंगवले दाखल झाले होते.

नवमतदारांमध्ये उत्साह
मतदान केंद्रावर नवमतदारांनी उत्साहाने मतदान केले. मतदानाचा पहिला पवित्र हक्क बजावल्यानंतर नवमतदारांनी प्रमाणपत्रासह सेल्फी घेत, आनंद व्यक्त केला. हा क्षण कॅमेराबद्ध करून सोशल मीडियावरून आपल्या मित्रआप्तेषटांना पाठविला जात होता. तसेच फेसबूक, व्हाट्सअप, इन्स्ट्राग्रामवर स्टेटस ठेवले जात होते.

मतदान केंद्रावर प्रबोधन
महापलिकेच्या वतीने उद्योगभवन येथे लघु उद्यागाचे महत्व अधोरेखित करण्यासाठी चित्रप्रदर्शन खुले करण्यात आले होते. यामध्ये महिलांसाठी असणाऱ्या लघु उद्योगांची माहिती चित्रांच्या माध्यमातून देण्यात आली. नक्षीकाम, रंगकाम, सुतारकाम, वीणकाम, हस्तकला, रांगोळी, चित्रकला विविध वस्तूंचे प्रदर्शन आकर्षन ठरले.

वृद्ध व दिव्यांगानी बजावला हक्क
दिव्यांग बांधव व वृद्ध मतदारांनी मतदान केंद्रवार येवून मतदानाचा हक्क बजावला. मतदान केंद्रावर दिव्यांगासाठी रँप तयार करण्यात आला होता. वृद्ध नागरिकांसाठी कार्यकर्त्यांनी खास रिक्षाची सोय केली होती.

कार्यकर्त्यांची राबणूक
मतदान केंद्राच्या १०० मिटरच्या बाहेर विविध पक्षाचे बूथ उभारले होते. या बुथमधुन कार्यकर्ते सकाळी सात वाजल्यापासून ते सायंकाळी ७ वाजेपर्यंत 12 तास थांबुन होते. मतदारांना व्होटर नंबर व खोली नंबर लिहून देण्याचे काम कार्यकर्ते करत होते. त्यामुळे मतदान सुलभ होती

Advertisement
Tags :

.