For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

मद्यपीचा बार व्यवस्थापकावर विळ्याने जीवघेणा हल्ला

12:17 PM Sep 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
मद्यपीचा बार व्यवस्थापकावर विळ्याने जीवघेणा हल्ला
Advertisement

उधारीवर दारू न दिल्याने काढला राग

Advertisement

बेळगाव : उधारीवर दारू दिली नाही म्हणून बारच्या व्यवस्थापकावर विळ्याने हल्ला करण्यात आला आहे. रविवारी दुपारी काकती येथे ही घटना घडली असून व्यवस्थापक जखमी झाला आहे. हल्ला करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. हिरामणी देवेंद्रप्पा जोरापूर (वय 52) असे जखमीचे नाव आहे. त्याच्यावर सिव्हिल हॉस्पिटलमध्ये उपचार करण्यात येत आहेत. घटनेची माहिती मिळताच काकतीचे पोलीस निरीक्षक सुरेश शिंगे व त्यांच्या सहकाऱ्यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली असून आरोपीला ताब्यात घेतले आहे.

मुत्यानट्टी येथील सुनील बसाप्पा करीकट्टी याच्यावर एफआयआर दाखल करण्यात आला आहे. हल्ला करताना हाताला विळा लागून तोही किरकोळ जखमी झाला आहे. गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर शनिवारी बार, दारू दुकाने बंद होती. रविवारी ती उघडली. दुपारी साडेबारा वाजण्याच्या सुमारास सुनील काकती येथील एका बारमध्ये गेला. त्याने व्यवस्थापकाकडे उधारी दारू मागितली. आपण या बारचे मालक नाही. केवळ व्यवस्थापक आहोत. त्यामुळे उधारी देता येणार नाही, असे व्यवस्थापकाने सांगितले. त्यामुळे राग अनावर झालेल्या सुनीलने व्यवस्थापकावर विळ्याने हल्ला केला आहे. काकती पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

Advertisement
Tags :

.