पुण्यात बेधुंद वागण्याचा गाठला कळसं....
01:43 PM Mar 08, 2025 IST | Pooja Marathe
Advertisement
पुणे
Advertisement
पुण्यामध्ये मद्यधुंद अवस्थेत वाहन चालवून अपघात होणे, मद्यधुंद अवस्थेत रस्त्यावर तमाशा करणे, स्थानिकांना त्रास देणे असे असंख्य प्रकार सातत्याने उघडकीस येत आहेत. अशातच आता आणखी एक व्हीडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओने पाहणाऱ्यांच्ये भुवयाच उंचावल्या आहेत.
पुण्यात अलिशान बीएमडब्यु गाडी रस्त्याच्या मधोमध उभी करुन मद्यधुंद अवस्थेत असलेल्या तरुणाने रस्त्यातच लघुशंका केल्याची घटना समोर आली आहे. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे. यावेळी स्थानिक नागरिकांनी या युवकाला हटकले, तेव्हा तो मद्यधुंद अवस्थेतील युवक अश्लील हावभाव करुन दाखवले. या सर्व प्रकाराचा व्हिडीओ स्थानिकांना कॅमेऱ्यामध्ये बंद केला असून, सर्वत्र खळबळ उडाली आहे. पुणे नगर मार्गावर असलेल्या शास्त्रीनगर चौकात ही संतापजनक घटना घडली आहे.
Advertisement
Advertisement