For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

बेंगळुरात तीन कोटीचे अमली पदार्थ जप्त

06:11 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
बेंगळुरात तीन कोटीचे अमली पदार्थ जप्त
Advertisement

प्रतिनिधी/ बेंगळूर

Advertisement

अमली पदार्थांची विक्री करणाऱ्या एका विदेशी महिला पेडलसह 7 ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आली आहे. तसेच त्यांच्याकडून 2.99 कोटींचे अमली पदार्थ जप्त करण्यात बेंगळूर शहर पोलिसांना यश आले आहे. अटकेतील आरोपींकडून गांजा, हेरॉईन, एमडीएमए क्रिस्टल, एमडीएमए एक्स्टसी फिल्स, एलएसडी स्ट्रिप्स आणि हायड्रो गांजा जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती शहर पोलीस आयुक्त दयानंद यांनी पत्रकार परिषदेत दिली.

विवेकनगर येथील रोझ गार्डनजवळ गांजा विक्री करणाऱ्या एका तस्कराला अटक करण्यात आली असून त्याच्याकडून 10 लाख रुपये किमतीचा 10 किलो गांजा, इलेक्ट्रॉनिक वजनाचे यंत्र, मोबाईल जप्त करण्यात आला आहे. यशवंतपूरच्या जेपी पार्कजवळील एसबीएम कॉलनीत हेरॉइनची विक्री करणाऱ्या मणिपूरस्थित ड्रग्ज तस्कराला अटक करण्यात आली असून 75 लाख रुपये किमतीचे 84 ग्रॅम हेरॉईन आणि एक मोबाईल जप्त केला आहे. अटक करण्यात आलेला आरोपी आपल्या मित्राच्या मदतीने हेरॉईन हे प्रतिबंधित अमली पदार्थ विकत होता. त्यालाही विवेकनगर येथील कॉम्प्लेक्सजवळ ताब्यात घेऊन चौकशी केली जात आहे

Advertisement

Advertisement
Tags :

.