महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

साडेतीन कोटींचे ड्रग्ज मणिपूरमध्ये जप्त

06:08 AM Apr 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भोपळ्यात लपवून तस्करीचा प्रकार उघड

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी शुक्रवारी भोपळ्यांमध्ये लपवून ठेवलेले 3.5 कोटी ऊपयांचे हेरॉईन जप्त केले. भारताशेजारील म्यानमारमधून या अमली पदार्थांची तस्करी केली जात असल्याचा संशय आहे. यंत्रणांना मिळालेल्या गुप्त माहितीवर कारवाई करत सुरक्षा दलाने ही कारवाई केली. यावेळी अब्दुल मन्नान मजुमदार आणि खलील उल्लाह बारभुईया या दोन ड्रग्ज तस्करांना अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले.

फिरजावल जिल्ह्यातील टिपाईमुख येथून दक्षिण आसाममधील कचारकडे जाणाऱ्या पिकअप ट्रकला जिरीबाम येथे अडवण्यात आले. गाडीची तपासणी केली असता सुरक्षा कर्मचाऱ्यांना 30 साबण बॉक्समध्ये 363.45 ग्रॅम हेरॉईन सापडले. हे अमली पदार्थ इतर भाज्यांसह पिकअप ट्रकमध्ये भरलेल्या भोपळ्यांमध्ये लपवले होते. ताब्यात घेतलेल्या व्यक्ती व जप्त केलेले अमली पदार्थ पुढील कायदेशीर कारवाईसाठी जिरीबाम पोलीस ठाण्याच्या ताब्यात देण्यात आले आहेत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article