कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

पणजीत 17 लाखांचा ड्रग्ज जप्त

12:19 PM Apr 29, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

दोन संशयितांना अटक, कारही जप्त 

Advertisement

पणजी : अमलीपदार्थ विरोधी विभागाने पाटो पणजी येथे पेलेल्या कारवाईत 17 लाखांचा ड्रग्ज जप्त केला आहे. या प्रकरणात दोन संशयितांना अटक करण्यात आली असून त्यांच्या विरोधात एनडीपीएस कायद्याखाली गुन्हा नोंद करण्यात आला आहे. संशयितांना रिमांडसाठी न्यायालयात हजर केले असता त्यांना दोन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. अटक केलेल्या संशयितांमध्ये रविराज गजानन रिवणकर (26, वेर्णा पिरनी सासष्टी), लिंगू येल्लापा डोनूर, (35, अग्निशामक केंद्राजवळ, आपें मडगाव) यांचा समावेश आहे. ही कारवाई काल सोमवारी दुपारी 1.30 ते 4 च्या दरम्यान करण्यात आली आहे. संशयित ड्रग्जची विक्री करण्यासाठी पाटो येथे येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. संशयित ठरलेल्या वेळेनुसार जीए-08-एबी-9780 क्रमांकाच्या कारने आले होते. पोलिसांनी कार अडविली आणि कारची तपासणी केली असता कारच्या डॅशबोर्ड बॉक्समध्ये 170 ग्रॅम लपवून ठेवण्यात आलेला ड्रग्ज जप्त करण्यात आला आणि संशयितांना अटक करुन कारही जप्त करण्यात आली. ही कारवाई एएनसीच्या अधीक्षक सुनिता सावंत, उपअधीक्षक नेरलॉन अल्बुकर्क यांच्या देखरेखीखाली एएनसी पोलिस पथकाने केली असून उपनिरीक्षक गिरीश टी. पाडलोस्कर पुढील तपास करीत आहेत.

Advertisement

बोरी येथे 6 लाखांचा गांजा जप्त

अमलीपदार्थ बाळगल्याप्रकरणी पैंगिण-काणकोण येथील बेनेदितो फर्नांडीस (54) याला फोंडा  पोलिसांनी अटक केली. त्याच्याकडून 6 किलो 314 ग्रॅम वजनाचा सुमारे 6 लाख 30 हजार ऊपये किमतीचा गांजा जप्त करण्यात आला आहे. सोमवारी दुपारी बोरी पुलाजवळ ही कारवाई करण्यात आली. बेनेदितो फर्नांडीस हा बोरी पुलाजवळ अमलीपदार्थाची विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली होती. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून ही कारवाई केली. पोलिस उपअधीक्षक शिवराम वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक विजयनाथ कवळेकर, हवालदार केदारनाथ जल्मी यांनी ही कारवाई केली. याप्रकरणी संशयिताविरोधात अमली पदार्थ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा नोंदविण्यात आला आहे. फोंडा येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकाऱ्यासमोर हजर केल्यानंतर दोन दिवसांच्या रिमांडवर त्याची पोलिस कोठडीत रवानगी करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article