For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

831 कोटींचे अमली पदार्थ महाराष्ट्र-गुजरातमधून जप्त

07:00 AM Aug 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
831 कोटींचे अमली पदार्थ महाराष्ट्र गुजरातमधून जप्त
Advertisement

वृत्तसंस्था/अहमदाबाद

Advertisement

गुजरात एटीएसने महाराष्ट्र आणि गुजरातमधील दोन औषध उत्पादन युनिटमधून 831 कोटी ऊपयांचे द्रव स्वरुपातील अमली पदार्थ जप्त केले आहेत. 5 आणि 6 ऑगस्ट रोजी ही कारवाई करण्यात आली असून दोन्ही ठिकाणांहून 4 जणांना अटक करण्यात आल्याचे एटीएसचे डीआयजी सुनील जोशी यांनी सांगितले. कारवाई करण्यात आलेल्या ठिकाणांवरून दहशतवादी गटाला अमली पदार्थांचा मोठ्या प्रमाणात पुरवठा होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर कारवाईचा निर्णय घेण्यात आला.

एटीएसच्या म्हणण्यानुसार, महाराष्ट्रातील ठाणे जिल्ह्यातून 800 किलो मेफेड्रोन औषध जप्त करण्यात आले. त्याची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत सुमारे 800 कोटी ऊपये आहे. तसेच गुजरातमधील भरूच जिल्ह्यातील एका औषध कारखान्यात केलेल्या कारवाईत 31 कोटी ऊपयांचे ट्रामाडोलही जप्त करण्यात आले आहे. 2018 मध्ये भारत सरकारने ट्रामाडोल औषधांवर बंदी घातली होती. ट्रामाडोलला फायटर ड्रग्ज असेही म्हणतात.

Advertisement

गोपनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे एटीएसच्या पथकाने 5 ऑगस्ट रोजी महाराष्ट्रातील भिवंडी, ठाणे येथील एका अपार्टमेंटवर छापा टाकला. येथून 800 किलो मेफेड्रोन ड्रग लिक्विड स्वरुपात जप्त करण्यात आले. या कारवाईवेळी मोहम्मद युनूस शेख व त्याचा भाऊ आदिल शेख यांना जागीच पकडले. या दोन्ही आरोपींनी महाराष्ट्रातील भिवंडी येथे बेकायदेशीरपणे मेफेड्रोन तयार करण्यासाठी गेल्या 9 महिन्यांपासून भाड्याने फ्लॅट घेतला होता. कच्चा माल व इतर वस्तू गोळा करून रासायनिक प्रक्रिया सुरू केली होती. एटीएसने गुजरातमधील आणखी एका कारवाईदरम्यान गुजरातमधील भरूच येथील दहेज औद्योगिक क्षेत्रातील औषध केंद्रावर छापा टाकत 31 कोटींचे पदार्थ जप्त केले.

Advertisement
Tags :

.