ड्रगमुळे ‘झॉम्बी’सारखे होते शरीर
मिठाच्या कणाइतका खाल्ल्यास होतो मृत्यू
तुम्ही अनेक धोकादायक नशांबद्दल म्हणजेच अमली पदार्थांबद्दल ऐकले असेल, परंतु सध्या ग्रीन फेंटोनाइल नावाचे ड्रग चर्चेत आहे. जर मिठाच्या कणाइतके म्हणजेच केवळ 2 मिलिग्रॅम देखील याचे सेवन केल्यास मृत्यू होऊ शकतो. अमेरिकेत सध्या याचा वापर अत्यंत वाढला आहे आणि यामुळे लोक मानसिक स्वरुपात आजारी होत आहेत. अमेरिकेत सर्वाधिक न्यू ऑरलियन्समध्ये अमली पदार्थांच्या सेवनाचे पीडित आहेत. अमेरिकेत या नव्या ड्रगचे सेवन करणाऱ्या लोकांची संख्या सातत्याने वाढत चालली आहे. ग्रीन फेंटेनाइल सामान्य फेंटेनाइलच्या तुलनेत 20 पट अधिक शक्तिशाली असून याचा ओव्हरडोस खूपच धोकादायक ठरू शकतो.
हा नॉर्मल फेंटेनाइलपेक्षा 20 पट तर हेरॉइन यासारख्या धोकादायक ड्रगपेक्षा 50 पट अधिक शक्तिशाली आहे. याची किंमत 100 डॉलर्स प्रतिग्रॅमपर्यंत आहे. या ड्रग्जला हुंगताच लोक बेशुद्ध पडतात आणि त्यांचे शरीर झॉम्बीप्रमाणे होते. अमेरिकेत 11-18 वयोगटातील 5.9 टक्के विद्यार्थी वेपिंग करतात. तर ब्रिटनमध्ये हा आकडा 7 टक्के आहे. याचबरोबर येथे लोक आइस्क्रीमद्वारे देखील या ड्रगचे सेवन करत आहेत. हे ड्रग पावडर इंजेक्शन आणि स्मोकद्वारे शरीरात घेतले जाते आणि ही पावडर जेल आणि टारच स्वरुपात मिळते. परंतु जेव्हापासून अमेरिकेत हे वॅपमध्य मिळाले आहे, तेव्हापासून याची अधिक चर्चा होत आहे. 18-45 वयोगटातील अमेरिकन्सच्या मृत्यूचे हे महत्त्वाचे कारण आहे. फेंटेनाइलमुळे 2000 सालापासून अमेरिकेत 10 लाखाहून अधिक लोकांचा मृत्यू झाला आहे.