For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

ऋषी नायरच्या पोटात सापडले ड्रग्स

12:27 PM Sep 12, 2025 IST | Tarun Bharat Portal
ऋषी नायरच्या पोटात सापडले ड्रग्स
Advertisement

वेर्णा पोलिसांकडून तपास सुरु : बिट्स पिलानीतील मृत्यू प्रकरण

Advertisement

मडगाव : बिट्स पिलानी कॅम्पसमध्ये ऋषी नायर (20) हा विद्यार्थी मृत आढळून आला होता. त्याच्या मृत्यूचे निदान करण्यासाठी उलटीच्या रँडॉक्स चाचण्या घेण्यात आल्या असता, अंमलीपदार्थांचे अंश आढळून आले. तीन प्रकारचे सिंथेटिक्स ड्रग्स सापडल्याने या प्रकरणाचा गुंता वाढला आहे. वेर्णा पोलिसांनी याप्रकरणी तपास सुरू केला आहे. बिट्स पिलानीमध्ये एका वर्षापेक्षा कमी कालावधीत मृत्युमुखी पडलेला ऋषी नायर हा पाचवा विद्यार्थी. 4 सप्टेंबर रोजी त्याला मृत्यू आला होता. त्यामुळे संपूर्ण राज्यात खळबळ माजली होती. ऋषी नायरने आत्महत्या केली नसल्याचे सुरवातीला सांगण्यात आले होते. त्याच्या मृत्यूचे निदान करण्यासाठी रँडॉक्स चाचण्या घेण्यात आल्यानंतर या चाचणी अहवालात अंमलीपदार्थांचे सेवन झाल्याचे पॉझिटिव्ह परिणाम आले आहे आणि तेव्हापासून, वेर्णा पोलिसस्थानकाचे पथक बिट्स पिलानीच्या कॅम्पसमध्ये तळ ठोकून आहे. आम्ही त्याच्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, असे दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले.

काय सांगतो रँडॉक्स चाचणी अहवाल?

Advertisement

  • रँडॉक्समशीनच्याअहवालात असे दिसून आले आहे की, चाचणीसाठी पाठवलेल्या आतड्याच्या नमुन्यात अंमलीपदार्थ आढले आहेत.
  • एक्स्टासी, अॅम्फेटामाइन्सआणिएमडीएमए हे अमलीपदार्थ आतड्यात आढळून आले आहेत.
  • रक्ताच्यानमुन्यात‘डिप्रेशन कंट्रोलर’ औषधांची उपस्थिती दिसून आली.
  • ‘शवविच्छेदनअहवालानुसारमृत्यूचे कारण उलटी येऊन गुदमरणे होते.
  • रँडॉक्सचाचणीतड्रग्जचे सेवन असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे सर्व बाजूनी तपास केला जात आहे, वर्मा यांनी स्पष्ट केले आहे.

ड्रग्ज शरीरात महिनाभरही राहतात 

शरीरात ड्रग्ज महिनाभरही राहतात, त्यामुळे आम्ही प्रत्येक बाजू तपासत असलो तरी या क्षणी काहीही गृहीत धरणे म्हणजे ते घाईचे ठरू शकते. ऋषी नायर याने खूप आधी ड्रग्ज घेतले असावेत. रँडॉक्स चाचण्या नकारात्मक आल्यामुळे मागील चार प्रकरणांमध्ये ड्रग्ज वगळण्यात आल्याचे आपण यापूर्वीच सांगितले होते असेही वर्मा म्हणाले.

सहा तासांपूर्वी ड्रग्ज सेवन केले?

ऋषी नायर याने झोपेत उलट्या केल्या असतील आणि उलटीमुळे त्याचा श्वास गुदमरला असावा असे निदान यापूर्वी करण्यात आले होते. पोटात आढळलेल्या ड्रग्जच्या उपस्थितीवरून असे अनुमान काढता येते की, त्याने मृत्यूच्या सहा तास अगोदर ड्रग्जचे सेवन केले असावे. आता चाचणीत ड्रग्जची पुष्टी झालेली आहे. ऋषी नायर याला ड्रग्ज अनावधानाने देण्यात आले होते की, त्याने ते स्वत: घेतले होते हे तपासणे आणि शोधणे पोलिसांवर अवलंबून आहे.

अशा घटना पुन्हा घडू नयेत

वर्षभराच्या आत बिट्स पिलानीच्या कॅम्पसमध्ये पाच विद्यार्थ्यांना मृत्यू आल्यानंतर सरकारने दक्षिण गोव्याच्या जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन केली. या समितीला निश्चित खात्री करावी लागेल की, महाविद्यालय सुप्रीम कोर्टाने ठरवलेल्या प्रक्रियांचे पालन करत आहे की, नाही. आमची भूमिका मृत्यूची चौकशी करणे नाही. पोलिसांना ते करावे लागेल, परंतु अशा घटना पुन्हा घडू नयेत यासाठी महाविद्यालय कसे काम करेल यावर समिती लक्ष केंद्रीत करणार असल्याचे जिल्हाधिकारी क्लीटस यांनी सांगितले.

- जिल्हाधिकारी एग्ना क्लीटस

एक्स्टासी, अॅम्फेटामाइन्स आणि एमडीएमए ड्रग्ज

त्याच्या मृत्यूचे निदान करण्यासाठी रँडॉक्स चाचण्या घेण्यात आल्यानंतर या चाचणी अहवालात ऋषी नायरने एक्स्टासी, अॅम्फेटामाइन्स आणि एमडीएमए या ड्रग्जचे सेवन केल्याचे पॉझिटिव्ह परिणाम आले आहे आणि तेव्हापासून, वेर्णा पोलिसस्थानकाचे पथक बिट्स पिलानीच्या कॅम्पसमध्ये तळ ठोकून आहे. आम्ही त्याच्या सहकाऱ्यांचे जबाब नोंदवत आहोत आणि सीसीटीव्ही फुटेज तपासत आहोत, असे दक्षिण गोव्याचे पोलिस अधीक्षक टिकम सिंग वर्मा यांनी सांगितले.

-टिकम सिंग

Advertisement
Tags :

.