औषधकरोधक बॅक्टेरिया 91 टक्क्यांनी वाढले
सुपरबगच्या नव्या प्रजातीही आढळून आल्या
आजारांच्या जोखिमीपासून वाचण्यासाठी अँटीबायोटिक औषधांचे वारेमाप सेवन रुग्णांसाठी जीवघेणे ठरत आहे. या औषधांच्या प्रतिरोधामुळे उपचारावर प्रभाव कमी होत असल्याची स्थिती आहे. तसेच नवे आणि घातक बॅक्टेरियाही वाढत असून त्यावर उपचार शक्य नाही.
नवी दिल्लीतील भारतीय आयुर्विज्ञान संशोधन परिषदेने (आयसीएमआर) एएमआर सर्व्हिलान्स रिपोर्ट जारी केला असून यानुसार भारताच्या रुग्णालयांमध्ये ओपीडीपासून वॉर्ड तसेच आयसीयूपर्यंत सुपरबगच्या नव्या प्रजाती मिळत आहेत. मागील काही वर्षांमध्ये अँटीबायोटिक प्रतिरोधामुळे औषधांना निष्प्रभ ठरविणारे बॅक्टेरिया 91 टक्क्यांपर्यंत वाढले आहेत. अहवालानुसार जानेवारी ते डिसेंबर 2024 दरम्यान देशभरातील रुग्णालयांमधून 99,027 कल्चर-पॉझिटिव्ह सॅम्पल मिळाले. यातील सर्वाधिक संक्रमण ग्राम नेगेटिव्ह बॅक्टेरियामुळे (जीएनबी) झाले, जो धोकादायक मानला जातो, कारण हा वेगाने औषधांबद्दल प्रतिरोधक होत चालला आहे.
अहवालातील सर्वात चिंताजनक चित्र आयसीयूतून समोर आले आहे, जेथे एसिनेटोबॅक्टर बाउमानी नावाचा बॅक्टेरिया 91 टक्क्यांपर्यंत औषधांबद्दल प्रतिरोधक दिसून आला. या बॅक्टेरियाला जागतिक आरोग्य संघटनेने स्वत:च्या गंभीर प्राथमिकता यादीत सामील केले आहे. आयसीयूत भरती गंभीर रुग्णांमध्ये हा बॅक्टेरिया जवळपास दर चौथ्या संक्रमणामागे आढळून आला आहे. या स्तराचा प्रतिरोध केवळ औषधांचे अपयश नव्हे तर एक उभरत्या सुपरबग इकोसिस्टीमचा संकेत आहे, ज्यात अनेक बॅक्टेरिया जीन-स्तरावरही एकमेकांबद्दल प्रतिरोध गुण शेअर करत आहेत.
टायफाइडमध्ये औषधे प्रभावहीन
अहवालात टायफाइडच्या वाढत्या प्रतिरोधाची स्थिती देखील गंभीर ठरविण्यात आली आहे. साल्मोनेला टाइफीची 95 टक्के प्रकरणे फ्लोरोक्विनोलोन समूहाच्या औषधांबद्दल प्रतिरोधी आढळून आली आहेत. हाच औषधसमूह मागील 2 दशकांपासून टायफाइडच्या उपचाराचे मुख्य स्रोत राहिला आहे.
ओपीडी व वॉर्डमध्येही बॅक्टेरिया
अहवालानुसार ओपीडी आणि सामान्य वॉर्डांमध्येही प्रतिरोधी बॅक्टेरिया वाढत आहेत. ओपीडीत संक्रमणाच्या प्रकरणांमध्ये ई. कोलाई आणि वॉर्डमध्ये क्लेबसिएला निमोनिया आणि स्यूडोमोनास एरुजिनोसा बॅक्टेरिया सर्वाधिक मिळाले आहे. या बॅक्टेरियांचा प्रतिरोधक पॅटर्न असा आहे की, हा डॉक्टरांना पहिल्या आणि दुसऱ्या लाइनच्या अँटीबायोटिक्स सोडून थेट अशा औषधांचा वापर करावा लागतो, ज्यांना लास्ट लाइन ड्रग्स म्हटले जाते.
तत्काळ कृती आवश्यक : आयसीएमआर
जर अद्यापही अँटीबायोटिकचा विवेकपूर्ण वापर, संक्रमण नियंत्रण आणि रुग्णालयांमध्ये देखरेखीला मजबूत न केल्यास उपचाराचे पूर्ण युग बदलू शकते. ही समस्या आता केवळ रुग्णालयांपर्यंत मर्यादित नाही, तर देशाच्या आरोग्य सुविधांना प्रभावित करणारे राष्ट्रीय संकट ठरले आहे. एकीकृत अँटीबायोटिक धोरण, रुग्णालयात नियमित ऑडिट आणि जनजागरुकतेला तत्काळ प्राथमिकता देण्याची शिफारस करण्यात येत असल्याचे आयसीएमआरच्या वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. कामना वालिया यांनी म्हटले आहे.
सुपरबग जीन नेटवर्कचा फैलाव
परीक्षणांमधून बॅक्टेरियादरम्यान एडीएम, ओएक्सए-48, टीईएम यासारखे रेजिस्टेंस जीन वेगाने फैलावत असल्याचे समोर आले आहे. त्यांना हाय-रिस्क क्लोन मानले जाते, कारण हे औषधांबद्दल प्रतिरोधाला एका पिढीतून दुसरी पिढी किंवा एका बॅक्टेरियामधून दुसऱ्यामध्ये सहजपणे स्थानांतरित करू शकतात. जर या जीन नेटवर्कवर आताच अंकुश लावण्यात न आल्यास आगामी वर्षांमध्ये हा समुदाय स्तरावरही फैलावू शकतो, जेथे नियंत्रण लावणे जवळपास अशक्य ठरेल असे डॉ. वालिया यांचे सांगणे आहे.