महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

ड्रग्जचा विळखा

06:35 AM Jun 26, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पुण्यातील फर्ग्युसन रस्त्यावरील पबमध्ये अमली पदार्थांचे सेवन करण्यात येत असल्याची चित्रफीत समोर आल्याने ड्रग्जचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आल्याचे दिसून येते. मागच्या ऑक्टोबर 2023 मध्ये ड्रग्ज तस्कर ललित पाटीलच्या अटकेतून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या होत्या. ड्रग्ज तस्करीच्या या प्रकरणात पाटीलला पोलिसांपासून ते वैद्यकीय अधिकाऱ्यांपर्यंत अनेकांची मदत झाल्याची माहिती पुढे आली होती. त्यामुळे ससून ऊग्णालयात पोलिसांचा 24 तास खडा पहारा असतानाही तिथे मेफेड्रॉन आरामात कसे पोहोचायचे आणि तो तेथून लाखो ऊपयांचे व्यवहार कसे करायचा, याच्या सुरस कथा बाहेर आल्या होत्या. त्यानंतर नाशिक, सोलापुरातील कारखान्यांवर छापे घातले गेले. तेथून करोडो ऊपयांचे मेफेड्रॉनही जप्त करण्यात आले. परंतु, त्यानंतरही ड्रग्ज तस्करीला आळा बसण्याऐवजी त्याचा बाजार जोमात असल्याचे पहायला मिळते. हे अतिशय गंभीर म्हणावे लागेल. पुण्यातील फर्ग्युसन रस्ता हे शहरातील अत्यंत गजबजलेले ठिकाण होय. शनिवारी, रविवारी तर हा रस्ता तऊणाईच्या गर्दीने ओसंडून वाहत असतो. येथील हॉटेल्स, बार, खाण्याचे ठेले, आईसस्क्रीम पार्लरमध्ये तऊणाईचा उत्फुल्ल आविष्कार पहावयास मिळतो. याच रस्त्यावर ‘एल 3 द लिझर लाऊंज’ नावाचा पब आहे. तेथील स्वच्छतागृहात काही तऊण शनिवारी मध्यरात्री ड्रग्जचे सेवन करीत असल्याचे आढळून आले. याबाबतचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर आता चौकशीला सुऊवात झाली आहे. त्यातून अनेक खळबळजनक गोष्टी पुढे आल्या असून, पोलीस यंत्रणेने संबंधितांच्या मुसक्या आवळायला सुऊवात केली आहे. याप्रकरणी पबमालकासह आठ जणांना अटक करण्यात आली असून, अधिक तपासातून अनेक बाबी पुढे येऊ शकतात. मुख्य म्हणजे बारमध्ये आयोजित करण्यात आलेल्या पार्टीत अनेक अल्पवयीन मुलांचा सहभाग होता. त्यांनाही अमलीपदार्थांची विक्री करण्यात आल्याचा पोलिसांना संशय असून, त्यादृष्टीने तपासही सुरू आहे. सध्या अल्पवयीन मुलांमधील गुन्हेगारीचे प्रकार वाढले आहेत. दोन जणांचा बळी घेणाऱ्या पोर्शे कार अपघातातील बिल्डरपुत्रानेही मद्यपान केल्याचे निष्पन्न झाले होते. मात्र, यातून मुले किंवा त्यांचे पालक धडा घेताना दिसत नाहीत. आपला मुलगा कुठे जातो, कुणासोबत जातो, त्याला काही चुकीच्या सवयी तर लागल्या नाहीत ना, याकडे बहुतांश बड्या घरचे पालक फारसे लक्ष देताना दिसत नाहीत. उलट लाडोबांना हवे ते पुरवण्याकडे त्यांचा कल असतो. त्यातूनच आजची तऊणाई बेधुंद व बेछूट होत असल्याचे दिसते. सदर पबमधील पार्टीत मोठ्या संख्येने अल्पवयीन मुले येत असतील, तर त्याचे उत्तरदायित्व त्यांच्या पालकांकडेही जाते. या पार्टीचे आयोजन कुणी अक्षय कामठे नामक व्यक्तीने केले होते. त्याने समाजमाध्यमातून याची जाहिरातही केली. त्याचबरोबर पार्टीसाठी ऑनलाईन शुल्क, रोख शुल्कही आकारले, असे सांगितले जाते. पबची वेळ संपल्याने पार्टीत सहभागी झालेल्या तऊणांना मागील दरवाजाने प्रवेश देण्यात आला होता. यातील एक आरोपी म्हणे त्यासाठी दरवाजाजवळच थांबला होता. अतिशय नियोजनबद्धरीत्या पार्टीचे आयोजित करण्यात आल्याचाच हा परिपाक ठरावा. पबमध्ये मोठ्या प्रमाणात मद्याचा साठा सापडला. त्याचबरोबर मुलांनी मद्यसेवन केल्याचेही आढळून आले. पार्टीतील दहा जणांच्या रक्ताचे नमुने पोलिसांनी तपासणीसाठी घेतले आहेत. त्यांच्या रक्ताच्या चाचणीचे रिपोर्ट आल्यानंतर त्यांनी अमलीपदार्थांचे सेवन केले आहे वा नाही, यावर प्रकाश पडू शकतो. तथापि, दोन मुलांनी आपण अमलीपदार्थांचे सेवन केल्याची कबुली दिली आहे. त्यामुळे व्हायरल व्हिडिओमध्ये तथ्य आहे, असे म्हणण्यास वाव आहे. एखाद्या व्यक्तीने अमलीपदार्थाचे सेवन केले असेल, तर त्याच्या शरीरात त्याचा अंश 48 तास राहतो. त्यामुळे संबंधित मुलांनी पार्टीत अमलीपदार्थांचे सेवन केले असल्यास त्याची माहिती वैद्यकीय तपासात उघड होईल, असे पोलीस आयुक्तांनी म्हटले आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा केल्याबद्दल आयुक्तांनी दोन अधिकाऱ्यांसह चार पोलिसांवर निलंबनाचीही कारवाई केली आहे. ललित पाटील प्रकरणातही पोलिसांवर कारवाईचा बडगा उगारला होता. मात्र, त्यानंतरही अशा प्रकरणांमध्ये पोलीस यंत्रणेतील काही घटकांचा सहभाग आढळून येणे, हा कुंपणानेच शेत खाण्याचा प्रकार म्हटला पाहिजे. हे पाहता भविष्यात अशा घटना घडू नयेत, यासाठी गृह विभागाला मोठ्या प्रमाणात साफसफाई मोहीम हाती घेणे क्रमप्राप्त ठरेल. दुसऱ्या बाजूला पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाचे नियम धुडकावून संबंधित पब पहाटे पाचपर्यंत सुरू असल्याचेही अधिक तपासास समोर आले आहे. एखादी घटना घडल्यानंतर तेवढ्यापुरत्या कारवाया होतात. मात्र, काही काळ लोटल्यानंतर या सगळ्या गोष्टी यथास्थित सुरू राहतात, हा आजवरचा अनुभव आहे. म्हणूनच याबाबत गृह व उत्पादन शुल्क विभागाने काटेकोर धोरण अवलंबणे आवश्यक होय. राज्याचे गृहमंत्रिपद देवेंद्र फडणवीस यांच्यासारख्या कार्यक्षम नेत्याकडे आहे. मात्र, मागच्या काही महिन्यांतील घटना बघता गृह विभागापुढील आव्हाने दिवसेंदिवस वाढताना दिसतात. त्यामुळे फडणवीस यांना अधिकचे लक्ष द्यावे लागेल. उत्पादन शुल्क मंत्री शंभूराज देसाई यांचे खातेही अलीकडे सातत्याने वादाच्या भोवऱ्यात सापडताना दिसते. आगामी काळात देसाई यांनाही आपला खात्यावरील वचक दाखवावा लागेल. तऊण पिढीला अमलीपदार्थाच्या नादी लावायचे, त्याकरिता आपले नेटवर्क वेगवेगळ्या शहरांमध्ये वाढवायचे आणि त्यातून लाखो ऊपये कमवायचे, हा एक पद्धतशीर कट आहे. तऊणाईच्या भवितव्यासाठी तो उधळून लावावाच लागेल.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article