महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

नेतान्याहू यांच्या घरावर ड्रोनचा हल्ला

06:07 AM Oct 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

इस्रायलचे नेते पत्नीसह सुरक्षित, सिनवारच्या हत्येचा बदला घेण्याचा इराणचा प्रयत्न

Advertisement

वृत्तसंस्था / जेरुसलेम

Advertisement

हमासचा म्होरक्या याह्या सिनवर याच्या इस्रायलने केलेल्या हत्येचा बदला घेण्याचा प्रयत्न इराणने हिजबुल्ला या दहशतवादी संघटनेच्या माध्यमातून केला आहे. इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांच्या खासगी निवासस्थानावर हिजबुल्लाच्या ड्रोनने शनिवारी हल्ला केला. मात्र, या हल्ल्यात घराची फारशी हानी झाली नाही. तसेच नेतान्याहू हे आपल्या पत्नीसह सुरक्षित आहेत.

इराणने नेत्यानाहू यांच्या हत्येसाठीच हा ड्रोन हल्ला केला होता, असा आरोप इdरायलने केला आहे. इस्रायलच्या एका वृत्तवाहिनीने ही माहिती या देशाच्या प्रशासनाच्या ज्येष्ठ सूत्रांच्या हवाल्याने दिली आहे. शनिवारी हिजबुल्लाने दक्षिण लेबेनॉनमधील आपल्या तळांवरुन इस्रायलवर अनेक अग्नीबाण डागले. तसेच काही ड्रोन्सच्या साहाय्यानेही हल्ला केला. तथापि, इस्रायलने बरेचसे अग्नीबाण निकामी केले. या हल्ल्यात इस्रायलची कोणतीही हानी झाली नाही, असे वृत्त आहे.

सिनवारची हत्या ड्रोननेच

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याची हत्या इस्रायलच्या एका ड्रोनने केली होती. हत्येपूर्वी सिनवार याचे अखेरचे काही क्षणही या ड्रोनवर बसविलेल्या कॅमेऱ्याने टिपले होते. हे व्हिडीओ चित्रण इस्रायलने प्रसारित केले आहे. सिनवार हा त्याच्या अखेरच्या क्षणी त्याच्या उध्वस्त झालेल्या घरात एकाकी होता. तो धुळीने माखला होता आणि जखमी अवस्थेत होता, असे दिसून आले आहे.

इराणकडूनही ड्रोनचा उपयोग

सिनवार याची हत्या इस्रालयने ड्रोनने केल्याने बेंजामिन नेत्यानाहू यांची हत्या करण्यासाठीही इराणकडून हिजबुल्लाच्या माध्यमातून ड्रोनचाच उपयोग करण्यात आला अशी माहिती देण्यात आली आहे. मात्र इस्रायलचा हल्ला यशस्वी ठरला होता. तसा हिजबुल्लाचा ठरु शकला नाही. तथापि, इराणच्या प्रमुख धर्मगुरुंनी इस्रायलचा सूड उगविला जाईल, अशी धमकी पुन्हा एकदा दिली आहे.

दहशतवाद्यांची भीती नाही

दहशतवाद्यांनी आपल्याला संपविण्याचा प्रयत्न केला असला तरी, आपण त्यांना घाबरत नाही, अशी प्रतिक्रिया इस्रायलचे नेते बेंजामिन नेतान्याहू यांनी व्यक्त केली आहे. आपण आपल्या कुटुंबियांसह सुरक्षित आहोत. हिजबुल्लाच्या हस्तकांकरवी इराणने केलेला हल्ला परतविण्यात आला आहे. अनेक क्षेपणास्त्रे आणि अग्नीबाण निकामी करण्यात आलेले आहेत, असे इस्रालयच्या सेना प्रवक्त्याने स्पष्ट केले.

इस्रायलचेही हल्ले सुरुच

इस्रायलनेही हमास आणि हिजबुल्ला यांच्यावर हल्ले सुरुच ठेवले आहेत. शनिवारी इस्रायली युद्ध विमानांनी लेबेनॉनमधील हिजबुल्लांच्या तळांना लक्ष्य केले. या हल्ल्यात या दहशतवादी संघटनेच्या काही हस्तकांचा मृत्यू झाला असल्याची माहिती देण्यात आली. अग्नीबाण सोडणाऱ्या यंत्रणेवरही हल्ला करण्यात आला. दहशतवाद संपल्याशिवाय थांबणार नाही, असा निर्धार इस्रायलने व्यक्त केला.

सिनवारच्या मृत्यूला दुजोरा

हमासचा म्होरक्या याह्या सिनवार याचा मृत्यू इस्रायलच्या हल्ल्यात झाल्याच्या वृत्ताला आता हमास आणि हिजबुल्ला या दहशतवादी संघटनांनीही दुजोरा दिला आहे. सिनवार हा त्याच्या भूमीगत घरात मारला गेला. या घरात इस्रायलच्या ड्रोसने अचूक मारा केला. या हल्ल्यात हे घर उध्वस्त झाले आणि सिनवार मारला गेला. नंतर सिनवारच्या मृतदेहाचे उत्तरीय परीक्षण करण्यात आले. तसेच त्याची डीएनए परीक्षाही करण्यात आली. या परीक्षणांमध्ये तो सिनवारच असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याचे मान्य करण्यात येत आहे, असे हमासने आपल्या शनिवारी प्रसिद्ध केलेल्या वक्तव्यात स्पष्ट केले आहे.

शस्त्रसंधीची शक्यता धूसर

ड इस्रायल-हिजबुल्ला यांच्यातील संघर्ष दीर्घकाळ चालत राहण्याची शक्यता

ड नेतान्याहू आणि त्यांच्या पत्नी हल्ला झालेल्या घरात नसल्याने असफलता

ड हिजबुल्लाचा हल्ला परतविण्यचा आणि प्रत्युत्तर देण्याचा इस्रायलचा निर्धार

ड हमास संघटनेकडून नव्या नेत्याची निवड, इराणची इस्रायलला पुन्हा धमकी

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article