महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

मणिपूरमध्ये सलग दुसऱ्या दिवशी ड्रोन अटॅक

06:21 AM Sep 04, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

कुकी उग्रवाद्यांकडून मैतेईबहुल भागात बॉम्बफेक : 2 जखमी

Advertisement

वृत्तसंस्था/ इंफाळ

Advertisement

मणिपूरच्या इंफाळ जिल्ह्यातील सेजम चिरांग गावात सोमवारी रात्री उग्रवाद्यांनी ड्रोन हल्ले केले आहेत. या हल्ल्यात एका महिलेसमवेत 3 जण जखमी झाले आहेत. मागील दोन दिवसात हा दुसरा ड्रोन हल्ला असल्याचे पोलिसांकडून सांगण्यात आले. सोमवारी सेजम चिरांगच्या नागरी वस्तीत ड्रोनद्वारे स्फोटके पाडविण्यात आली, या स्फोटकांनी छत तोडल्यावर घरांमध्ये स्फोट झाला आहे. उग्रवाद्यांनी पर्वतीय भागातून गोळीबार देखील केला, याला प्रत्युत्तर म्हणून सुरक्षा दलांनी गोळीबार केला.

सेजम चिरांग गाव हे कोत्रुकपासून सुमारे 3 किलोमीटर अंतरावर आहे. कोत्रुक गावात रविवारी ड्रोन हल्ला झाला होता आणि गोळीबारात दोन जणांना जीव गमवावा लागला होता. तर 9 जण जखमी झाले होते. कुकी उग्रवाद्यांना ड्रोन वॉरफेयरसाठी म्यानमारमधून तांत्रिक सहाय्य आणि प्रशिक्षण मिळत असल्याचे आणि म्यानमारमधील गट या हल्ल्यात थेट सहभागी असल्याची शंका व्यक्त होत आहे.

2 बॉम्ब घरांवर कोसळले

ड्रोनचा पहिला हल्ला सेजम चिरांग गावातील मानिंग लीकाईमध्ये 65 वर्षीय वाथम गंभीर यांच्या घरावर झाला, त्यांच्या घराच्या छतावर बॉम्ब पाडविण्यात आला, तर दुसरा बॉम्ब त्यांच्या घरानजीकच्या गल्लीत पाडविण्यात आला, तर तिसरा बॉम्ब नदीच्या काठावर पडून तेथेच स्फोट झाला. वाथम गंभीर यांची मुलगी सनातोम्बी (23 वर्षे) या हल्ल्यात जखमी झाली असून तिला त्वरित रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वाथम यांचे बंधू जोतिन (56 वर्षे) हे या हल्ल्यात किरकोळ जखमी झाले आहेत.

दारूगोळा हस्तगत

शोधमोहिमेदरम्यान कांगपोकपी जिल्ह्याच्या खारम वैफेई गावानजीक पोलिसांनी एक ड्रोन हस्तगत केला आहे. कांगपोकपी जिल्ह्याच्या कांगचुप पोनलेनमध्ये सुरक्षा दलांच्या शोधमोहिमेदरम्यान शस्त्रास्त्रs तसेच स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत. यात 10 रायफल्स, एक इम्प्रोवाइज्ड मोर्टार, 9 इम्प्रावाइज्ड मोर्टार बॅरल, 20 जिलेटिन रॉड, 30 डेटोनेटर, 2 देशी रॉकेट्स सामील आहेत.

5 घरांना पेटविण्याचे कृत्य

इंफाळपासून 18 किलोमीटर अंतरावरील कोत्रुक गाव हे मैतेईबहुल आहे. रविवारी दुपारी या गावच्या दिशेने गोळीबार झाला, यामुळे लोकांना जीव वाचविण्यासाठी गोळीबार करावा लागला. उग्रवाद्यांनी त्यानंतर रिकामी घरांमध्ये शिरून लूट केली आहे. तसेच 5 घरांना तसेच उभ्या वाहनांना उग्रवाद्यांनी पेटवून दिले आहे. तर सुरक्षा दलांनी रविवारी रात्री या उग्रवाद्यांना हुसकावून लावले आहे. कुकी उग्रवाद्यांनी या गावावर ड्रोनद्वारे बॉम्ब पाडविले होते. यामुळे गावातील सर्व 17 परिवारांना स्थलांतर करावे लागले आहे.  हे सर्वजण इंफाळ, खुरखुल आणि सेक्माई येथे गेले आहेत. पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणावर हिंसा भडकण्याची भीती त्यांना सतावू लागली आहे.

भाजप आमदाराची मागणी

भाजप आमदार आणि मुख्यमंत्री विरेन सिंह यांचे जावई राजकुमार इमो यांनी व्रींय गृहमंत्री अमित शाह यांना पत्र लिहून केंद्रीय सुरक्षा दलांना राज्यातून माघारी बोलाविण्यात यावे अशी विनंती केली आहे. सुरक्षेची सर्व जबाबदारी आता राज्याला देण्यात यावी अशी त्यांची मागणी आहे. राज्यात केंद्रीय सुरक्षा दलांचे 60 हजार जवान असल्याने शांतता प्रस्थापित होत नसल्याने त्यांना राज्यातून माघारी बोलाविण्यात यावे असे इमो सिंह यांनी म्हटले आहे.

3 दिवसात गाव रिकामी करा

मैतेई लोकांनी 3 दिवसांत गाव रिकामी न केल्यास कुकी स्वयंसेवक त्यांना हुसकावून लावतील अशी धमकी कुकी-जो व्हिलेज वॉलंटियर्सनी दिली आहे. मैतेई उग्रवादी चूराचांदपूर-कांगपोकपीला सातत्याने लक्ष्य करत आहेत असा दावा या संघटनेने केला आहे. कुकी-जो समुदायाच्या लोकांनी 31 ऑगस्ट रोजी रॅली आयोजत करत मणिपूरमध्ये स्वतंत्र कुकीलँड निर्माण करण्याची मागणी केली आहे. पुंड्डेचेरीच्या धर्तीवर विधानसभेसोबत एक केंद्रशासित प्रदेश निर्माण करावा असे त्यांचे म्हणणे आहे.

 

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article