For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

वझे गल्ली गणेशोत्सव मंडळातर्फे डॉ. किरण ठाकुर यांचा सत्कार

11:17 AM Sep 19, 2024 IST | Tarun Bharat Portal
वझे गल्ली गणेशोत्सव मंडळातर्फे डॉ  किरण ठाकुर यांचा सत्कार
Advertisement

बेळगाव : वझे गल्ली, वडगाव येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाला तरुण भारतचे समूहप्रमुख व सल्लागार संपादक डॉ. किरण ठाकुर यांनी कार्यकर्त्यांच्या विनंतीवरून भेट दिली. या ठिकाणी त्यांच्या हस्ते श्रींची महाआरती करण्यात आली. मंडळातर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी बोलताना डॉ. किरण ठाकुर यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रेरणेने बेळगावमध्ये गणेशोत्सव सुरू झाला आहे. समाजाने एकत्र यावे व सामाजिक प्रबोधन व्हावे हा मूळ हेतू या उत्सवाचा आहे. या हेतूपासून मंडळांनी दूर जाऊ नये व मंडळातर्फे विविध उपक्रम राबवावेत, असे सांगितले. याप्रसंगी मंडळाचे कार्याध्यक्ष मंगेश नागोजीचे, अध्यक्ष भाऊ पाटील व बापू नावगेकर, उपाध्यक्ष हरी बडसकर, नागेश काकतकर, सचिव भूषण निलजकर व विनायक माळवी, खजिनदार सागर यलजी व योगेश सुंठकर तसेच उपसचिव ओमकार यलजी व राजू मन्नोळकर, उपखजिनदार पिंटू दावणेकर व कपिल निट्टूरकर, हिशेब तपासणीस, पंच मंडळी व सदस्य उपस्थित होते.

Advertisement

Advertisement
Tags :

.