महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

बेळंकीत कॅनॉलमध्ये टँकर उलटून चालक ठार

03:32 PM Jan 28, 2025 IST | Radhika Patil
featuredImage featuredImage
Advertisement

सलगरे : 

Advertisement

बेळंकी (ता. मिरज) येथे मिरज-सलगरे रस्त्यावर गंगाटेक नजीक असणाऱ्या कॅनॉलमध्ये टँकर उलटून चालक प्रशांत भिमाप्पा कोळी (वय 36, रा. बसर्गी) हा जागीच ठार झाला. शनिवारी रात्री पावणेबाराच्या सुमारास ही दुर्घटना घडली. चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटल्याने कॅनॉलचा कठडा तोडून टँकर पलटल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. 

Advertisement

शनिवारी रात्री पावणे बारा वाजण्याच्या सुमारास बेळंकी मार्गे कर्नाटक राज्याकडे मोलॅसिस वाहतुकीचा टँकर (केए-71-0432) जात होता. बेळंकीच्या अलीकडे गंगाटेक येथून उतरता रस्ता पार करत असताना टँकरने अचानक वेग पकडला. यामुळे चालकाचे वाहनावरील नियंत्रण सुटले. रस्त्यालगतच असलेल्या कॅनॉलच्या कठड्याला धडकून टँकर कॅनलमध्ये कोसळला. चालक प्रशांत भिमाप्पा कोळी जागीच ठार झाला.

 ड्रायव्हर सिटवरच रक्तबंबाळ अवस्थेत चालक अडकून पडला होता. टँकरधील मोलॅसिस पसरल्याने बचाव कार्यात अडथळे येत होते. पहाटेपर्यंत बचाव कार्य राबवून चालकाला बाहेर काढले. मात्र, तोवर त्याचा मृत्यू झाला होता. याबाबत मिरज ग्रामीण पोलिसात नोंद करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia