महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

सर्व दलालांना हाकलून लावा

07:18 AM Dec 27, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आमदार मायकल लोबो यांची पोलिसांना सूचना

Advertisement

प्रतिनिधी/ म्हापसा

Advertisement

कळंगुटमध्ये जलसफरीची बोट उलटून एका पर्यटकाचा मृत्यू झाल्याच्या घटनेबाबत कळंगुटचे आमदार संतप्त झाले आहेत. एका बोटीमागे 20 ते 25 कर्मचारी का? हे बोट कर्मचारी नसून हे सर्व दलाल आहेत, या सर्वांना अटक करा. जे बोटीचे कर्मचारी आहेत त्यांच्या गळ्यात ओळखपत्र सक्तीचे करा. कोण नियमांचे पालन करीत नाही, ओळखपत्र गळ्यात घालत नाहीत त्यांना अटक करीत 5 हजार ऊपयांचा दंडही द्या. कुणीच दलाल समुद्रकिनाऱ्यावर दिसता कामा नये, असा इशारा आमदार मायकल लोबो यांनी किनारी पोलिस निरीक्षक जतीन पोतदार व कळंगुट पोलिस निरीक्षक परेश नाईक यांना दिला आहे.

दरदिवशी किती दलाल पकडले जातात, किती जणांवर कारवाई होते याचा अहवाल पोलिस अधिकाऱ्यांनी दरदिवशी आपल्यास सादर करावा, असे आमदार मायकल लोबो यांनी पोलिस अधिकाऱ्यांना सूचित केले. गुऊवारी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी बोटीत बसविल्याने जी दुर्घटना घडली त्याची नैतिक जबाबदारी आम्ही घ्यायलाच पाहिजे, कारण या घटनेत कुणाचा जीव गेला आहे. शिवाय लहान मुलेही दुर्घटनेत सापडली आहेत. 500 ऊपयांसाठी आम्ही कुणाचा जीव गमवावा असे आपण होऊ देणार नाही.

किती वर्षांपर्यंतच्या मुलांना समुद्रात नेऊ शकतो, याबाबत नियमावली लिखित दाखवावी. दरपत्रकही स्पष्टपणे लिहावे. नियमावलीची अधिकाऱ्यांनी तपासणी करावी. गोव्यात हजारो पर्यटक येतात. ते पाण्यात उतरल्यास त्यांना सुरक्षा द्यायलाच हवी. यापुढे क्षमतेपेक्षा जास्त पर्यटक बसविल्यास त्यांचा परवाना रद्द होणार अशी ग्वाही आपण देतो, असेही लोबो म्हणाले.

एका बोटमालकाकडे अंदाजे तीनशे कर्मचारी असतात. त्यापैकी 150 हे दलाल असतात. हे दलाल पर्यटकांना लुटतात. मात्र पोलिसांकडून किनाऱ्यावरील दलालांना अटक होत नाही, असा आरोप यावेळी आमदारांनी केला. प्रत्येक दिनी किती दलाल अटक होतात याचा संदेश दर दिवशी पोलिसांनी आपल्यास द्यावा. गोव्याची नाहक बदनामी होऊ देणार नाही. काही फोटोग्राफर समुद्रकिनाऱ्यावर फोटो काढतात, त्यांना अटक करावी. त्यांच्या जागी गोमंतकीय फोटोग्राफरांची नेमणूक करावी, अशी मागणी यावेळी नागरिकांनी आमदार लोबो यांच्याकडे केली

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article