गरोदरपणात वाईन पिणे धोकादायक
एका आठवडय़ात 12 ग्रॅम अल्कोहोलमुळे बदलतो मुलाचा चेहरा
जगभरातील आरोग्यतज्ञ गरोदर महिलांना अल्कोहोलपासून दूर राहण्याचा सल्ला देत असतात. मद्यपानामुळे गर्भाला अनेक प्रकारे नुकसान होत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. अलिकडेच नेदरलँडच्या इरासमस मेडिकल सेंटरच्या वैज्ञानिकांनी याविषयी संशोधन पेल आहे. एक आठवडय़ात केवळ एक ग्लास वाइन पिल्याने गर्भाच्या चेहऱयात कायमस्वरुपी बदल होऊ शकतात, असे यात आढळून आले आहे.
या संशोधनात वैज्ञानिकांनी 5 हजार 600 शालेय मुलामुलींच्या चेहऱयांमधील 200 वैशिष्टय़ांचे अध्ययन केले. 3डी इमेजिंग आणि डीप लर्निंग अल्गोरिदमच्या मदतीने हे शक्य झाले. या मुलामुलींपैकी काही जणांच्या मातांनी गरोदरपणात अल्कोहोलचे सेवन केले होते. तर काही महिलांनी मद्यापासून अंतर राखले हेते. संशोधकांनुसार एका आठवडय़ात केवळ 12 ग्रॅम अल्कोहोल सेवन केल्याने भूणाचा चेहरा स्थायी स्वरुपात बदलू शकतो.
गर्भधारणेनंतर मद्यपान केल्याने भूणाच्या चेहऱयात अनेक प्रकारचे बदल दिसून येऊ शकतात, यात छोटे नाक, हनुवटी बाहेरच्या दिशेने असणे इत्यादी लक्षणे यात सामील आहेत. गरोदर महिलेने अधिक प्रमाणात मद्यपान केल्यास भ्रूणांमधील हे बदल तितकेच अधिक तीव्र असतात. गरोदरपणादरम्यान आणि त्याच्या 3 महिन्यांपूर्वी पासून मद्यपान करणाऱया महिलांच्या मुलांसोबत हे विशेषकरून घडत असल्याचे संशोधकांनी म्हटले आहे.
फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर
गरोदरपणात अल्कोहोलचे सेवन केल्यास गर्भाला फीटल अल्कोहोल स्पेक्ट्रम डिसऑर्डर होण्याची भीती असते. यामुळे मुलाच्या चेहऱयासोबत मेंदूवरही प्रभाव पडतो. तो मानसिकदृष्टय़ा कमजोर होऊ शकतो. त्याच्या वर्तनात देखील समस्या असू शकते. यापूर्वी झालेल्या एका संशोधनात गरोदरपणात दर आठवडय़ाला 70 ग्रॅम अल्कोहोलचे सेवन केल्यास मुलावर पडणाऱया प्रभावासंबंधी अध्ययन करण्यात आले होते. यातही अशाच प्रकारे निष्कर्ष प्राप्त झाले होते.