महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

ड्रिलिंगचे काम आता संथगतीने

07:00 AM Nov 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अंतिम टप्प्यात माती कोसळण्याच्या धोक्यामुळे सावध पवित्रा : बोगद्यात अडकलेल्यांच्या बचावाचे प्रयत्न सुरूच

Advertisement

वृत्तसंस्था /उत्तरकाशी

Advertisement

उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यात अडकलेल्या कामगारांना 12 व्या दिवशीही मोकळा श्वास घेता आलेला नाही. आता ड्रिलिंगच्या माध्यमातून कामगारांना बाहेर काढण्यासाठी अतिशय सुरक्षित आणि सावधपणे कार्य राबवले जात आहे. गेल्या दोन दिवसात 50 ते 55 मीटरपर्यंत ड्रिलिंगचे काम पूर्ण झाल्याचे सांगितले जात आहे. अजूनही पाच-सहा मीटर ड्रिलिंग होण्याची आवश्यकता असून हा टप्पा अतिशय महत्त्वाचा आहे. ड्रिलिंगवेळी बसणाऱ्या हादऱ्यांमुळे माती आणि खडकांचा भाग कोसळू नये यासाठी अतिशय हळुवारपणे पुढील खोदकाम सुरू आहे. बचाव मोहिमेच्या दहाव्या दिवशी मंगळवारी बोगद्यात अडकलेले कामगार  सुखरूप असल्याचा पहिला व्हिडिओ समोर आला. या व्हिडिओमुळे त्यांच्या कुटुंबीयांना आशा तर दिलीच पण बचाव मोहिमेतील कर्मचाऱ्यांचे मनोबलही उंचावले. बोगद्यात अडकलेल्या कामगारांपर्यंत जेवण, पाणी आणि ऑक्सिजन यांचा पुरवठा योग्य पद्धतीने होत असल्यामुळे सध्या सर्व कामगार सुस्थितीत आहेत. मात्र, त्यांच्यापर्यंत पुरेसा प्रकाश किंवा उजेड पोहोचत नसल्यामुळे त्यांची प्रकृती बिघडण्याचा धोका आहे. अशा स्थितीत त्यांच्या बचावासाठी व्यापकदृष्टीने विचार करून तज्ञांच्या देखरेखीखाली बचावकार्य राबवले जात आहे. गुरुवारी दिवसभरात ड्रिलिंगचे काम सुरू असताना दोन-तीनवेळा मशीन बंद पडली. सायंकाळच्या सुमारासही पुन्हा मशीन बंद पडल्यानंतर काम थांबवण्यात आले असून आता शुक्रवारी सकाळीच पुन्हा कामाला सुरुवात होण्याची शक्यता व्यक्त होत आहे.

मशीनच्या प्लॅटफॉर्ममध्ये समस्या

बोगद्यात पाईप टाकणाऱ्या ऑगर मशीनचा प्लॅटफॉर्म कोसळला आहे. त्यामुळे खोदकाम बंद करावे लागले. सुरुवातीला गुऊवारी दुपारी 1.15 वाजता कामगारांपर्यंत पोहोचण्यापूर्वी मशीन बंद पडली होती. त्यानंतर पुन्हा सायंकाळी प्लॅटफॉर्म कोसळल्यामुळे काम थांबवण्यात आले. वारंवार येणाऱ्या या व्यत्ययामुळे पाईप टाकण्याच्या कामात अडथळे येत आहेत. अडकलेल्या कामगारांना वाचवण्यासाठी दुसरा बोगदा खोदण्याची प्रक्रिया सुरू आहे. उत्तरकाशी जिल्ह्यातील चारधाम यात्रा मार्गावर निर्माणाधीन साडेचार किलोमीटर लांबीच्या सिलक्मयारा बोगद्याचा एक भाग 12 नोव्हेंबर रोजी कोसळल्यामुळे कामगार ढिगाऱ्याच्या दुसऱ्या बाजूला अडकले आहेत. बोगद्यात अडकलेल्या कामगारांना बाहेर काढण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारच्या 19 एजन्सी बचावकार्यात सहभागी आहेत. तसेच त्यांच्यातील समन्वयासाठी वरिष्ठ अधिकारीही सिलक्यारामध्ये तळ ठोकून आहेत.

बोगद्यात अडकलेल्यांशी मुख्यमंत्र्यांनी साधला संवाद

मुख्यमंत्री धामी यांनी गुरुवारी त्संपर्क यंत्रणेद्वारे बोगद्यात अडकलेल्या कामगारांशी काहीवेळ संवाद साधत त्यांचे मनोबल वाढविण्याचा प्रयत्न केला.  त्यानंतर बोगद्यात अडकलेले सर्व कामगार बांधव सुदृढ आणि सुरक्षित असल्याची माहिती त्यांनी सोशल मीडिया साईटवर दिली. आदरणीय पंतप्रधान सतत आपल्या संपर्कात असून परिस्थितीची माहिती घेत आहेत आणि बचावकार्यावर लक्ष ठेवत असल्याचेही त्यांनी नमूद पेले. बचावकार्य योग्य दिशेने सुरू असून लवकरच सर्व कामगार बांधव सुखरूप बाहेर पडतील आणि त्यांच्या कुटुंबियांसमवेत असतील, असेही मुख्यमंत्री म्हणाले. बचावकार्यादरम्यान भारतीय हवाई दलाच्या विमानांकडूनही विशेष उपकरणे मागवण्यात आली आहेत. सिलक्मयारा येथे सुरू असलेल्या बचावकार्यात राज्य आणि केंद्र सरकारच्या विविध यंत्रणांसह आंतरराष्ट्रीय तज्ञ कार्यरत आहेत. तसेच इतर तांत्रिक संस्थांकडूनही पूर्ण सहकार्य केले जात असल्याचे पंतप्रधान कार्यालयाचे माजी सल्लागार भास्कर खुल्बे यांनी सांगितले. ड्रिलिंग मशीनच्या मार्गात आलेली लोखंडी जाळी सकाळी काढल्यामुळे कामगारांसाठी सुटकेचा मार्ग सुकर झाल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

अडकलेले कामगार चाकांच्या स्ट्रेचरवरून पडतील बाहेर

रेस्क्मयू पाईप सिलक्मयारा बोगद्याच्या ढिगाऱ्यातून आर-पार झाल्यानंतर सध्या सुरू असलेल्या ड्रिलिंगचे काम पूर्ण होईल. त्यानंतर एनडीआरएफचे जवान दोरीला बांधलेल्या चाकांच्या स्ट्रेचरद्वारे अडकलेल्या कामगारांना एक-एक करून बाहेर काढतील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने गुऊवारी सांगितले. पुढील सर्व माहिमेसाठी एनडीआरएफचे महासंचालक अतुल करवाल यांच्यासह त्यांची विशेष टीम घटनास्थळी सज्ज आहे. एनडीआरएफचे जवान पाईपमधून आत जातील आणि एकदा का ते कामगारांपर्यंत पोहोचले की, ते त्यांची उपकरणे वापरून त्यांना एक-एक करून बोगद्यातून बाहेर पाठवतील. 800-मिमी व्यासाच्या पाईपमधून कामगार सुरळितपणे बाहेर पडू शकतील अशी स्ट्रेचर्सची रचना करण्यात आली आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article