स्वप्नवत गाव, तरीही ग्रामस्थ त्रस्त
कारण जाणून घेतल्यावर चकित व्हाल
जेव्हा कुठे हिंडण्याचा विचार समोर येतो तेव्हा स्वप्नवत वाटावे, अशा ठिकाणाचा शोध सुरू होतो. कुणाला हिमाच्छादित पर्वत पसंत असतात, तर कुणाला समुद्र आवडतो. तसेही पऱ्यांची कहाणी तुम्ही ऐकली असेल, तर एका सुंदर देशाची कल्पनाही केली असेल. एक असेच गाव आहे ज्याने ते पाहिले, त्याने तेथे वसण्याचा विचार केला असेल.
काही ठिकाणं इतकी सुंदर असतात की मनात घर करून राहतात. एक असेच गाव आहे जेथे प्रत्येक जण जाऊ इच्छितो. परंतु तेथील लोक अत्यंत त्रस्त आहेत. खासकरून हिमवृष्टीच्या काळात हे गाव जणू नंदनवनच ठरत असते.
ऑस्ट्रियाच्या सालाझ्काम्मेरगुट प्रांतात एक छोटे गाव असून त्याचे नाव हॉलस्टॅट आहे. हे गाव अत्यंत सुंदर असल्याने जणू परीकथेच्या कहाणीतून बाहेर पडल्याचा भास होतो. ऑस्ट्रियाच्या टॉप ट्रॅव्हल डेस्टिनेशनमध्येही हे गाव सामील आहे. या गावात 800 लोक राहतात आणि युनेस्कोच्या जागतिक वारसास्थळाच्या यादीत ते सामील आहे. तेथे मानवी कवट्यांना रंगवून ठेवण्यात आले असून ती एल्पाइन ट्रेडिशन आहे. याचबरोबर येथे मिठाची एक सुंदर खाण आहे, स्वत:च्या सौंदर्यामुळे लोक येथे मोठ्या प्रमाणात दाखल होत असतात.
ग्रामस्थ त्रस्त का?
अत्यंत प्रसिद्ध असूनही येथील ग्रामस्थ त्रस्त का असा प्रश्न लोकांना पडतो. परंतु येथील ग्रामस्थांना पर्यटकांमुळेच समस्या झाली आहे. पीक टाइममध्ये येथे दररोज 10 हजार पर्यटक दाखल होत असतात. यामुळे ग्रामस्थांच्या खासगीत्वावर संकट उभे ठाकले आहे. याचमुळे आता तेथे संध्याकाळी 5 नंतर पर्यटक बसेसच्या प्रवेशावर बंदी घालण्यात आली आहे. तसेच येथील एक भुयार बंद करत ग्रामस्थांनी पर्यटकांना रोखण्याचे आवाहन केले होते. तसेच एंटी सेल्फी फेन्सही लोकांनी उभारले असून एका प्रसिद्ध पर्वतावर बॅरिकेड करण्यात आले आहे. छोट्या गावात मोठ्या संख्येत पर्यटक आल्याने समस्या उभी ठाकते. कमीतकमी पर्यटक यावेत आणि ऑफ सीजनमध्ये येण्याचा प्रयत्न करावा असे आवाहन आता ग्रामस्थांकडून केले जात आहे. ग्रामस्थांना दैनंदिन जीवनात शांतता हवी आहे.